छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्याजवळ गोळीबाराची घटना घडली आहे. दोन कर्मचाऱ्यांच्या आपापसातील झटापटीदरम्यान अचानक पिस्तूलमधून गोळी सुटली आणि ती थेट एका कर्मचाऱ्याच्या पोटात घुसली. या गोळीबारात भरत घाटगे नावाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर गोळीबार करणारा दुसरा कर्मचारी घटनास्थळावरून फरार झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, सध्या या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. पोलीस फरार झालेल्या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत आणि गोळीबारामागील नेमके कारण काय होते, याचा तपास करत आहेत. या घटनेमुळे टोलनाक्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.