1 किलोची गोल्ड चेन घालून जोफ्रा आर्चरची चीटिंग? व्हायरल व्हिडीओनंतर प्रश्नचिन्ह
GH News July 12, 2025 08:05 PM

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेची उत्सुकता दोन सामन्यानंतर वाढली आहे. कारण या दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसर्‍या सामन्यात दोन्ही संघ चांगल्या कामगिरीसाठी आग्रही आहेत. टीम इंडियात जसप्रीत बुमराहचं आगमन झालं. तर इंग्लंड संघात चार वर्षानंतर जोफ्रा आर्चरचं आगमन झालं आहे. आर्चरने पहिल्या षटकात भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल याला बाद करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वेगवान गती आणि अचून टप्प्यामुळे आर्चरने लक्ष वेधून घेतलं आहे. मागच्या काही वर्षात दुखापतीमुळे संघाच्या बाहेर होता. पण असं असताना सोशल मीडियावरील एका व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

जोफ्रा आर्चरच्या पुनरागमनानंतर एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओत जोफ्रा आर्चर सोन्याच्या साखळीला घासला जातो. हे आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं जात आहे, असं म्हणणं नेटकरी करत आहेत. कारण चेंडूच्या पृष्ठभागावर बाह्य वस्तू घासणे हा बॉल टॅम्परिंगचा प्रकारात मोडते. असं केल्याने चेंडू रिव्हर्स स्विंग करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियावर चाहते आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. काही जणांच्या मते, हे एक नकळत झालेलं कृत्य आहे. पण लॉर्ड कसोटीत तरी त्याने असं काही केलेलं नाही.

बॉल टॅम्परिंगबाबत आयसीसीचे नियम

आयसीसी नियमानुसार, चेंडूच्या पृष्ठभागाला कोणत्याही बाह्य वस्तूने किंवा पदार्थाने बदल करण्यास मनाई आहे. खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी फक्त घामाचा वापर करू शकता. ते देखील पंचांच्या देखरेखीखाली करू शकता. साखळीसारख्या कोणत्याही वस्तू चेंडू घासल्यास नियमांचं उल्लंघन मानलं जातं. यामुळे दंड, सामना शुल्क कपात किंवा बंदी यासारखी कठोर शिक्षा होऊ शकते.

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम गोलंदाजी करावी लागली. इंग्लंडने 10 गडी गमवून 387 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवस अखेर भारताने तीन गडी गमवले आहेत. अजूनही इंग्लंडकडे 180 हून जास्त धावांची आघाडी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.