यंदा नेपाळमधील काठमांडू येथे जागतिक संस्कृत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही संस्कृत भाषेसाठी समर्पित एक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषद आहे, यात जगातील सर्वात प्राचीन आणि गूढ भाषेचा उत्सव साजरा केला जातो. दर तीन वर्षांनी विविध देशांमध्ये ही परिषद भरवली जाते. यात जगभरातील हजारो विद्वान एकत्र येतात. या परिषदेत ते संस्कृत भाषा, साहित्य आणि तत्त्वज्ञानावरील संशोधन सादर करतात आणि त्यावर सखोल चर्चा करतात.
यंदाच्या 5 दिवसीय परिषदेचे उद्घाटन नेपाळच्या राष्ट्रपतींनी केले. भगवान स्वामीनारायण यांचे नेपाळसोपत पवित्र नाते आहे. त्यामुळे अक्षर-पुरुषोत्तम दर्शन जे भगवान स्वामीनारायण यांनी सांगितलेल्या वेदांत तत्वज्ञानावर आधारित आहे. याबाबत एक विशेष सत्र आयोजित करण्यात आले होते.
1790 च्या दशकात स्वामीनारायण यांनी जवळपास तीन वर्षे नेपाळमध्ये प्रवास केला होता. या प्रवासात त्यांनी तपश्चर्या, योगाभ्यास आणि दिव्य ज्ञानाद्वारे नेपाळच्या भूमीला पावन केले. याच काळात त्यांनी अक्षर-पुरुषोत्तम दर्शनाचे मूलभूत सिद्धांत सांगितला होता, जी आज एक मान्यताप्राप्त वेदांत शाखा आहे. 28 जून रोजी भरवलेल्या या विशेष सत्रात नेपाळ, भारत, अमेरिका, चीन, जपान तसेच अनेक युरोपीय देशांतील विद्वान सहभागी झाले होते.
या सत्राचे अध्यक्ष महामहोपाध्याय स्वामी भद्रेशदास होते, जे स्वामीनारायण भाष्यचे लेखक आणि वेदांताचे जागतिक कीर्तीचे अभ्यासक आहेत या सत्रात पुढील मान्यवर सहभागी झाले होते.
नेपाळमधील काही प्रमुख संस्थांचे प्रतिनिधीही या सत्रात सहभागी झाले होते. यात नेपाळ संस्कृत युनिव्हर्सिटी, राष्ट्रीय धर्म जागरण अभियान, जयतु संस्कृतम्, नेपाळ शिक्षण परिषद, नेपाळ पंचांग निर्णयक विकास समिती, नेपाळ पंडित महासभा, नेपाळ महर्षी वैदिक फाउंडेशन आणि वाल्मिकी विद्यापीठ यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.
या सत्राद्वारे नेपाळमध्ये पहिल्यांदाच शास्त्रीय पातळीवर अक्षर-पुरुषोत्तम दर्शनाची औपचारिक ओळख झाली. या ऐतिहासिक प्रसंगी परम पूज्य महंत स्वामी महाराजांनी आपल्या व्हिडिओ संदेशाद्वारे संपूर्ण परिषदेच्या यशासाठी प्रार्थना केली. या सत्रात खालील विद्वानांनी आपले शोधनिबंध सादर केले.
या सत्रात भाषण करताना प्रो. श्रीनिवास वरखेदी यांनी भगवान स्वामीनारायण प्रकट केलेल्या अक्षर-पुरुषोत्तम सिद्धांताचे वेदांत परंपरेतील योगदानाचा उल्लेख केला. तसेच सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी या वर्षापासून आपल्या अभ्यासक्रमात हा सिद्धांत समाविष्ट करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
महामहोपाध्याय स्वामी भद्रेशदास यांनी समारोपाच्या भाषणात, नेपाळची पावन भूमी, भगवान स्वामीनारायण यांचा प्रवास आणि त्यांनी सांगितलेले दिव्य तत्त्व अधोरेखित केले. सनातन वैदिक परंपरेचा हा अखंड प्रवाह आजही नवीन तात्त्विक विचारांना जन्म देत आहे असं ते म्हणाले. यानंतर या परिषदेची सांगता झाली.