राज्यात 328 नवे मद्यविक्री परवाने दिले जाणार आहेत. हे परवाने दुकानांना नव्हे तर कंपन्यांना दिले जाणार आहेत. प्रत्येकी एका कंपनीला मद्यविक्रीचे 8 परवाने दिले जातील. राज्याचा महसूल वाढवण्यासाठ सरकारने हे पाऊल उचलले आहे. तसेच राज्यात जुना मद्यविक्री परवाना विकत घेण्यासाठी 10 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. तर नवीन परवाना घेण्यासाठी कंपन्यांना राज्य सरकारला फक्त एक कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. यावरुन आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
जितेद्र आव्हाड म्हणाले की, ‘लाडक्या बहिनींच्या नावाखाली त्यांचा संसार उद्धवस्त करण्यचा काम सुरू आहे. या सरकारला सत्तेची मस्ती आली आहे. अर्थव्यस्थेचा खेळखंड़ोबा सुरू आहे. बहिनींना पैसे देण्यासाठी त्यांच्या पती, भाऊ यांना बेवडे करण्याचं काम सुरू आहे. वाजले की बारा, वाजले की बारा असं म्हणायची वेळ आली आहे.’
पुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, 47 कंपन्या कुणाच्या आशिर्वादाने सुरू आहे. तुम्हाला मद्याची नाही तर सत्तेची झिंग आली आहे. महाराष्ट्र हा येड्यांचा बाजार नाहीये. माझ्या बहिनींना पैसे देण्यासाठी दारू परवाना देत आहे. हा महाराष्ट्र वारकऱ्यांचा, साधू संतांचा आहे की बेवड्यांचा आहे? असा सवालही आव्हाड यांनी विचारला आहे. तसेच इतर विरोधी नेत्यांनीही सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, मला माझ करा, मी नशेत आहे. रुफ टॉफवर दारू विकायला बंदी आहे. दारूड्याचं सरकार आहे का, बेवड्याचं सरकार आहे? आता चपट्या खिशात घेऊन फिरण्याची मुभा द्या. मी विधानसभेत घेऊन जाणार आहे. पाणी नाही मिळाले तर चालेले मात्र दारू घरात मिळणार. हे सरकार मॅकडॉलन्सची सरकार आहे. दत्ता भरणेंना सांगा लाडक्या बहिनींना घेऊन जा आणि चंद्रभागेत जाऊन ढकलून द्या. पैसे कमवायचे आहेत तर गेट ऑफ इंडिया विका, किल्ला विका असंही आव्हाड यांनी म्हटलं.