आपल्या शरीरातील अनेक अवयव आहेत. परंतू किडनी असा महत्वाचा अवयव आहे ज्याकडे बहुतांश लोक तोपर्यंत लक्ष देत नाहीत जोपर्यंत ती खराब होत नाही. हा शरीराची सफाई करणारा फिल्टर आहे. जो रक्त साफ करुन शरीराती टॉक्सिन्स आणि बिना उपयोगाचे घटक युरिनद्वारे शरीराच्या बाहेर टाकतो.या ब्लड प्रेशर नियंत्रित करणे, शरीरातील पाणी आणि खनिजांचे संतुलन राखणे, विटामिन्स डीला सक्रीय करणे अशी आवश्यक काम करीत असतो.
परंतू आपल्या काही सवयी हळू-हळू किडनीला नुकसान करतात. परंतू त्याचा आपल्याला लवकर पत्ता लागत नाही. या सवयी वेळीच सुधारल्या नाहीत तर हा क्रॉनिक किडनी डिसिज वा किडनी फेल्युअरसारखी गंभीर स्थितीत बदलू शकतो. चला तर रोजच्या अशा १० सवयी पाहूयात ज्यामुळे हळूहळू किडनी खराब होते. या सवयी वेळीच जर बदलल्या तर किडनीचे आरोग्य सुधरु शकते.
दुखण्यासाठी किंवा ताप येणे का आयुब्रुप्रोफेन वा एस्पिरिन गोळ्या खाणे सर्वसामान्य मानले जाते. परंतू जास्त प्रमाणात ही औषधे घेणे किडनीत रक्ताचा पुरवठा कमी करतात. आणि हळूहळू किडनी डॅमेज होऊ लागते. जर तुम्हाला किडनीचा कोणताही आजार असेल तर डॉक्टरांना न विचारचा पेन किलर अजिबात खाऊ नका.
मीठाचे म्हणजेच सोडियमचे जास्त सेवन हायब्लड प्रेशरचे कारण बनते आणि हे किडनी डॅमेजचे प्रमुख कारण आहे. यामुळे जेवणात वरुन मीठ टाकण्याच्या ऐवजी लिंबू, धने, आलं वापरु शकतो. पॅकबंद आणि जंकफूडमध्ये जास्त सोडीयम असते. त्यांचा वापर कमी करा.
किडनीचे काम नीट होण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यायला हवे. जर तुम्ही कमी पाणी प्याल तर शरीरातील टॉक्सिन्स एकत्र होतात, ज्यामुळे किडनीवर दबाव वाढतो आणि स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते. दिवसभरात ६ ते ८ ग्लास पाणी पिणे चांगले म्हटले जाते.
फास्ट फूड, पॅकींगच्या मधील पदार्थ वा रेडी टू ईट पदार्थांत साखर आणि केमिकलचे प्रमाण जास्त असू शकते आणि फायबर आणि पोषक तत्वांचे प्रमाण कमी असते. या सवयीमुळे केवळ किडनीलाच नव्हे तर शरीराच्या इतर भागाला सुद्धा त्रास होतो. रोजच्या आहारात फळ, हिरव्या भाज्या आणि घरच्या जेवणाचा समावेश करा.
कमी झोपणे हार्मोनल असंतुलन किडनीच्या कामकाज प्रभावित करु शकते. अनेक संशोधनात असे स्पष्ट झाले आहे की सहा तासांहून कमी झोपण्याने हाय ब्लड प्रेशर आणि किडनीशी संबंधित आजारांचा धोका जास्त असतो. यासाठी दिवसातून ७ ते ८ तास झोप घेणे गरजेचे असते.
हाय प्रोटी डाएट म्हणजे रेड मीट वा जास्त प्रोटीन स्रोतामुळे किडनीवर दबाव येतो. कारण किडनीला जास्त टाकाऊ पदार्थांना गाळावे लागते.जर किडनी कमजोर असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानूसार प्रोटीनचे सेवन करावे.
जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा आणि डायबिटीजचा धोका वाढला आहे.किडनी फेल होण्याच्या कारणांपैकी हे एक मोठे कारण आहे. कोल्ड ड्रींक, पॅकेज्ड स्नॅकस, गोड दहीसारख्या पदार्थांपासून दूर रहावे.
सिगारेट आणि मद्यामुळे लिव्हर आणि फप्फुसाचे नुकसान होतेच शिवाय किडनीचा रक्तपुरवठा बाधित होतो. किडनीची कार्यक्षमता कमजोर होते. जर किडनी आणि स्वत:चे आयुष्य वाढवायचं असेल तर धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर व्हायला हवे.
जे कोणतीही फिजिकल एक्टिव्हीटी करीत नाहीत त्यांच्या वजन वाढणे, हाय बीपी आणि किडनी रोगांचा धोका वाढतो. त्यामुळे रोज हल्काफुल्का एस्करसाईज सारखा योग वा स्ट्रेचिंग करायला हवा,ज्यामुळे किडनीचे आरोग्य चांगले रहाते.
आपण नेहमी छोट्या-मोठ्या दुखण्यामुळे मेडिकल स्टोरमध्ये जाऊन औषधे घेतो. ही सवय किडनीला गंभीर स्वरुपात प्रभावित करु शकते. कोणतेही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावा खासकरुन प्रदीर्घ काळासाठी औषधे घेत असाल.
किडनीचे आरोग्य राखण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, जास्त मीठ आणि साखर घेऊ नये ,जंक आणि प्रोसेस्ड फूड कमी खावे, पुरेशी झोप घ्यावी. नियमित व्यायाम करावा.मद्य आणि धुम्रपानापासून दूर राहावे. वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी. खासकरून हाय बीपी वा डायबिटीज असेल तर अधिक काळजी घ्यावी.