SL vs BAN 2nd T20i : श्रीलंकेकडे मालिका विजयाची संधी, बांगलादेश रोखणार का?
GH News July 13, 2025 07:06 PM

श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशला आतापर्यंत कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत काही खास करता आलं नाही. त्यामुळे पाहुण्या बांगलादेशला दोन्ही मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेने 3 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने आपल्या नावावर केली. त्यानतंर श्रीलंकेने बांगलेदश विरुद्धची 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. आता या दोन्ही संघात 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेचा थरार रंगत आहेत. श्रीलंकेने पहिला सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना दोन्ही संघांसाठी मालिकेच्या दृष्टीने निर्णायक होणार असल्याचं स्पष्ट आहे.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20i सामना केव्हा?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20i सामना रविवारी 13 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20i सामना कुठे?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20i सामना रणगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20i सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश दुसरा टी 20i सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.

बांगलादेशसाठी ‘करो या मरो’ सामना

चरिथ असलंका या मालिकेत श्रीलंकेचं नेतृत्व करत आहे. तर लिटॉन दास याच्याकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. श्रीलंकेचा हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. त्यामुळे श्रीलंका सलग दुसरा सामना जिंकण्यासाठी सज्ज आहे. तर बांगलादेशला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे पाहुण्यांचा यजमानांनासमोर चांगलाच कस लागणार आहे. आता या दुसऱ्या सामन्यात बांगलादेश श्रीलंकेसमोर कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.