Kiwi : पचनाच्या समस्येवर रामबाण उपाय – किवी
Marathi July 13, 2025 09:25 PM

बाजारात वर्षभर किवी फळ उपलब्ध असते. किवीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, फायबर यासारखी विविध पोषक घटक आढळतात, त्यामुळे किवी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. किवीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असल्याने वेटलॉससाठी किवी खाणे उपयुक्त ठरते. किवी केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. किवीतील विविध पोषकतत्वांमुळे किवी पचनाच्या समस्येवर रामबाण उपाय सांगण्यात येतो. एका संशोधनानुसार, दररोज दोन किवी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनसंस्था मजबूत होते. आज आपण जाणून घेऊयात, पचनाच्या समस्येवर किवी फळ कसे फायदेशीर ठरते.

  • किवीमध्ये नैसर्गिकरित्या ऍक्टिनिडिन एंझाइम असते, जे प्रोटिन पचवण्यास मदत करते. याशिवाय यात फायबरचे प्रमाण जास्त असते, जे आतड्यांना चांगले कार्य करण्यास मदत करते. त्यामुळे किवी खाण्याचा सल्ला पोटाचे आरोग्या चांगले ठेवण्यासाठी दिला जातो.
  • किवी हे इम्युनिटी बुस्टर आहे, यात व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत आहे. एका किवीमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे शरीराची रोगांशी लढण्यास मदत होते.
  • किवी फळांमध्ये पोटॅशियम, फायबर, ऍटी-ऑक्सिडंट्स असतात, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.
  • झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुम्ही किवीचे सेवन करायला हवे. तुम्ही दररोज दोन किवी खाल्ल्यास निद्रानाश दूर होण्यास मदत होईल.
  • किवीमध्ये कमी कॅलरीज असतात आणि फायबरचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे पोट दिर्घकाळ भरलेले राहते.
  • व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले किवी त्वचेची चमक वाढवते आणि सुरकुत्या कमी करते. तसेच, केस गळण्याची समस्या कमी करू शकते.

 

 

हेही पाहा –

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.