लवकरच आणखी एक युद्ध भडकणार? 2 देशांतला तणाव वाढला; हजारो सैनिक तयार!
GH News July 14, 2025 12:06 AM

तैवानच्या स्वायत्ततेच्या मुद्द्यावरून चीनने नेमहीच आक्रमक पवित्रा धारण केलेला आह. त्यामुळेच चीन आणि तैवान यांच्यात तणावाची स्थिती पाहायला मिळते. दरम्यान आता नवी आणि महत्त्वाची माहिती समोर येत आहे. चैवान चीनच्या विरोधात युद्धाची तर तयारी करत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे तैवानच्या एका निर्णयानंतर चीननेही आपली लष्करी जमवाजमव चालू केली आहे. त्यामुळे आता या दोघांमध्ये युद्ध छेडले जाते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.

नेमके काय घडते आहे?

मिळालेल्या माहितीनुसार तैवानने चीनच्या विरोधात आतापर्यंतचा सर्वात मोठा युद्धाभ्यास चालू केला आहे. या युद्धाभ्यासात तब्बल 22 हजार राखीव सैनिकांचा समावेश करण्यात आला आहे. एवढंच नाही. तर या युद्धाभ्यासात विध्वंसक क्षेपणास्त्रांचाही समावेश करण्यात आला असून त्याचे परीक्षण केले जात आहे. तैवानची ही तयारी समजताच चीननेही कंबर कसली असून प्रशांत महासागरातील बेटांवर आपली गस्त वाढवली आहे.

युद्धाभ्यासात हजारो सैनिक सामील

तैवानकडून केल्या जात असलेल्या युद्धाभ्यासात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यात सायबर अटॅक, क्षेपणास्त्र हल्ला, जमिनीवरची लढाई यांचा सराव केला जात आहे. या युद्धाभ्यासात हजारो सैनिक सामील झाले आहेत. आर्टिलरी, टँक्स, मिसाईल्स यांना घेऊन सराव केला जात आहे. विशेष म्हणजे देशातील सामान्य जनतेलाही या ड्रिलमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.

फायटर जेटच्या निर्मितीची गती वाढवली

तैवानची ही सगळी हालचाल लक्षात घेता चीननेही सतर्कतेची भूमिका घेतली आहे. चीकडून फायटर जेटच्या निर्मितीची गती वाढवण्यात आली आहे. त्यामुळेच या सर्व घडामोडी पाहता हे युद्धाचे संकेत तर नाहीत ना? असा सवाल अनेकांना पडला आहे. चीनने लढाऊ विमानांचे उत्पादन वाढवले आहे. चीनतर्फे J-35 या लढाऊ विमानांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. चीनचा हा पवित्रा लक्षात घेता लवकरच हा देश तैवानवर हल्ला करून तो प्रदेश काबीज करण्याच्या तयारीत आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. J-35 हे लढाऊ विमान विशेषत: सर्जिकल स्ट्राईकदरम्यान वापरले जाते.

अमेरिका तैवानला साथ देणार?

अमेरिका हा महासत्ता असलेला देश याआधीपासूनच तैवानची वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत आलेला आहे. नुकतेच अमेरिकेने जपान आणि ऑस्ट्रेलिया यांना तुमची चीन आणि तैवान संघर्षावर भूमिका काय आहे? असे विचारलेले आहे. त्यामुळे आता खरंच चीन आणि तैवान यांच्यात युद्ध चालू होणार का? ते चालू झाले तर यात अमेरिकेची भूमिका काय असणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.