श्रावण हा हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचवा महिना आहे. श्रावण महिन्यात धार्मिक कार्य अधिकाअधिक करावे असे सांगितले जाते. हा महिना शिवाला समर्पित महिना सांगितला जातो. यंदा महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात शुक्रवार, 25 जुलै 2025 रोजी होत आहे. आरोग्याच्यादृष्टीने हा महिना महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात वातावरणात दमटपणा, ओलसरपणा असल्याने या दिवसात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे सांगितले जाते. त्यामुळे काही पदार्थ खाण्यास मनाई करण्यात आली आहे. यात केवळ दूध आणि दहीच नाही, तर वांगी, हिरव्या पालेभाज्या आणि काही उसळींचे पदार्थ खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण जाणून घेऊयात श्रावणात कोणते पदार्थ खाण्यास मनाई असते.
वांगी आणि पालेभाज्या –
श्रावणात वांगी आणि पालेभाज्या खाण्यास मनाई करण्यात आली आहे. या महिन्यात वांग्यामध्ये किडे असण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय वांगी पचायला जड जातात. ज्याचा परिणाम पोटावर होऊन पोटाचे विकार होऊ शकतात.
हिरव्या पालेभाज्या –
पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांमध्ये कीटक आणि बुरशी असण्याची शक्यता असते. अशा भाज्या खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरतात.
दूध आणि दही –
पावसाळ्यात दुधाचे पदार्थ पचायला जड असते. याशिवाय वातावरणात आर्द्रतेमुळे सर्वत्र बॅक्टेरिया आणि जंतू असतात. ज्यामुळे गॅस, ऍसिडिटी, अपचन किंवा पचनासंबंधीत समस्या सुरू होतात. त्यामुळे या दिवसात दूध आणि दही खाऊ नये असे सांगितले जाते. दुसरं कारण म्हणजे पावसाळ्यात प्राणी जे गवत किंवा चारा खातात, त्यात कीटक लपलेले असतात,ज्यामुळे दुधाच्या शुद्धतेवर परिणाम होतो.
उसळी –
पावसाळ्यात पचायला जड असलेल्या उसळी खाऊ नयेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पचनशक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तीने तर खाऊ नयेत
हेही पाहा –