इंग्लंडने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. इंग्लंडने सामन्यातील पाचव्या दिवशी 14 जुलैला टीम इंडियावर 22 धावांनी मात केली आहे. इंग्लंडने यासह या मालिकेतील दुसरा विजय मिळवला आहे. इंग्लंडने टीम इंडियासमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. केएल राहुल याच्यानंतर रवींद्र जडेजाने इंग्लंडसमोर संघर्ष केला. मात्र त्यांना दुसऱ्या बाजूने चांगली साथ मिळाली नाही. इंग्लंडने भारताला दुसऱ्या डावात 74.5 ओव्हरमध्ये 170 धावांवर ऑलआऊट केलं आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.