WTC 2027 : तिसर्‍या कसोटी पराभवानंतर भारताचं नुकसान, अंतिम फेरीचं गणित होणार किचकट
GH News July 15, 2025 01:06 AM

भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळे आता नव्या पर्वात भारताची त्यासाठी धडपड सुरु आहे. पण इंग्लंडमधील तीन कसोटी सामन्यातील कामगिरी पाहता भारताचं पुढचं गणित कठीण होत जाणार आहे. कारण ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पुढच्या काळात बरीच चढाओढ पाहायला मिळणार आहे. भारताचा हा प्रवास पुढे आणखी कठीण होत जाणार आहे. कारण की भारताला या साखळीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज, श्रीलंका, न्यूझीलंड या संघांचा सामना करायचा आहे. त्यामुळे हा प्रवास पुढे अजून किचकट होत जाणार आहे. भारताच्या पुढील कसोटी मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध 2, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 2, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5, श्रीलंकेविरुद्ध 2 आणि न्यूझीलंडविरुद्ध 2 सामने खेळणार आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध त्यांच्या भूमीवर खेळणार आहे.

गुणतालिकेत अशी भारताची टक्केवारी

ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 100 टक्के असून त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध दोन्ही सामने जिंकले आहेत. तिसऱ्या सामन्याच्या निकालाचा यावर परिणाम होऊ शकतो. श्रीलंका बांग्लादेश कसोटी मालिकेनंतर श्रीलंकेची विजयी टक्केवारी ही 66.67 टक्के आहे. इंग्लंडने तिसरा कसोटी सामना जिंकल्याने विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. इंग्लंडची विजयी टक्केवारी ही 66.67 टक्के झाली. भारताने तिसरा कसोटी सामना गमावल्याने विजयी टक्केवारीत घट झाली आहे. भारताची विजयी टक्केवारी 50 वरून 33.33 झाली आहे. तसेच चौथ्या स्थानी घसरण झाली आहे.

भारताने हातात असलेला सामना गमावला

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना भारताने अवघ्या 22 धावांनी गमावला.  इंग्लंडने दुसऱ्या डावात 192 धावा केल्या आणि विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना भारताने 170 धावांपर्यंत मजल मारली. रवींद्र जडेजाने या सामन्यात एकाकी झुंज दिली. या पराभवामुळे भारताचा लॉर्ड्सवरील पराभवाची मालिका सुरुच राहिली आहे. आतापर्यंत भारताने 20 कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळले. त्यापैकी 3 सामन्यात विजय, 13 सामन्यात पराभव आणि चार सामने कसेबसे ड्रॉ केले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.