Vaishnavi Hagavane death case Pune : वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळी प्रकरणात (Vaishnavi Hagavane death case) आज दोषारोपपत्र सादर झालं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) 1676 पानांचा दोषारोपपत्र तयार केलं आहे. आत्महत्येच्या 59 दिवसांनी हे दोषारोपपत्र बावधन पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात सादर करण्यात आलं. वैष्णवीने 16 मे 2025ला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
हगवणे कुटुंबातील सासरा राजेंद्र, पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा आणि दिर सुशील यांनी तिला जीव देण्यास भाग पाडले. हुंड्यासाठी हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीचा अमानुष छळ केला. त्यानंतर हगवणे कुटुंबियांना बेड्या ठोकण्यात आल्या. तर वैष्णवीच्या दहा महिन्याच्या बाळाची हेळसांड प्रकरणी निलेश चव्हाणही अटकेत आहे. त्यानंतर पोलिसांनी 59 दिवसांत 1676 पानांच्या दोषारोपपत्र सादर केलं. यात एकूण अकरा आरोपींच्या नावाचा उल्लेख आहे. यातील सासरा राजेंद्र आणि दिर सुशांतला सात दिवस वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यासाठी आसरा देणाऱ्या पाच जणांचा समावेश आहे. त्यांना अटकेनंतर जामीन मिळाला होता, उर्वरित सहा जण येरवडा तुरुंगाची हवा खातायेत.
वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी (16 मे रोजी) घरात बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. काही वेळानंतर पती शशांक यांनी दरवाजा वाजवला. मात्र दरवाजा न उघडल्याने त्यांनी तो दरवाजा तोडला. त्यानंतर ही घटना समोर आली. वैष्णवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे की, वैष्णवीचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिली. मारहाण व जाच करून तिच्या मृत्यूस ते कारणीभूत ठरले आहेत.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे, पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिष्मा आणि दिर सुशील यांया अटक करण्यात आली होती. त्यांनतर निलेश चव्हाणला देखील पोलिसांनी अटक केली होती. वैष्णवी हगवणेचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिली होती.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा