IND vs ENG: टीम इंडियाचा पराभव, पण सुपरस्टार जडेजाच्या खेळीवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
Marathi July 15, 2025 03:25 AM

10 जुलैपासून लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात तिसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी शानदार खेळ केला, पण विजय इंग्लंडच्या पदरात पडला. इंग्लंडने 22 धावांनी सामना जिंकत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी मिळवली आहे.

सोमवारी लॉर्ड्सवर संपलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील शेवटचा दिवस कोट्यावधी भारतीयांचे मन तोडून गेला. भारतीय संघाच्या विजयासाठी 193 धावांचा पाठलाग करताना अनेक फलंदाजांनी तसा आत्मविश्वास दाखवला नाही, जसा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah & mohmmed Siraj) आणि मोहम्मद सिराज यांनी दाखवला.

अखेरीस, शेवटपर्यंत रोमांचक राहिलेल्या या कसोटीत शुबमन गिलची (Shubman gill) टीम इंडिया अवघ्या 22 धावांनी पराभूत झाली. पण या पराभवात रवींद्र जडेजाने दोन्ही डावांत अर्धशतक आणि विशेष म्हणजे दुसऱ्या डावात विलक्षण जिद्द दाखवून कोट्यवधी भारतीय चाहत्यांची मने जिंकली. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचं भरभरून कौतुक होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.