युतीचा निर्णय कसा होणार? राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सगळं सांगून टाकलं; दिला मोठा आदेश!
GH News July 15, 2025 06:08 PM

Raj Thackeray : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. या निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. मनसे पक्षानेही कंबर कसली असून या निवडणुकीसाठी सर्वच स्तरावर नियोजन केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना दिली आहे.

राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला महत्त्वाचा आदेश

राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटासोबतच्या युतीबाबत कोणाही काहीही बोलू नये. प्रवक्त्यांनीही माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठेही प्रतिक्रिया देऊ नये, असा आदेश राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणखी एक महत्त्वाचा आदेश दिला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी मतदार यांद्यांवर बारीक काम करा, असं त्यांनी आपल्या आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय.

इगतपुरीमध्ये चालू आहे मनसेचे शिबीर

सध्या इगतपुरी येथे मनसेचे शिबीर चालू आहे. या शिबिरात राज ठाकरे तिथे गेले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांशी बातचित केली आहे. याच चर्चेदरम्यान त्यांनी वरील आदेश दिलाय. तसेच माध्यमांसमोर काय बोलायला हवं आणि काय नको याबाबतही त्यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत.

युतीवर न बोलण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

राज ठाकरे यांनी ठाकरे गटासोबतच्या युतीवरबाबतही पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. युताबाबत काय निर्णय घ्यायचा आहे तो मी घेईन. तुम्ही याबाबत माध्यमांशी काहीही बोलायचं नाही. युतीबाबत मी योग्य वेळी बोलेन असेही त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना निक्षून सांगितले आहे.

राज ठाकरेंनी निर्णय राखून ठेवला

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांचा मनसे आणि उद्धव ठाकरे यांचा ठाकरे गट यांच्यात युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या युतीबाबत मात्र राज ठाकरे यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची युती अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे आता राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.