Tesla India Launch : मोबाईलच्या किंमतीत बुक करा टेस्लाची कार, टेस्लाच्या Y मॉडेलची भारतात एन्ट्री जोरदार खरेदी
GH News July 15, 2025 06:08 PM

Vinfast VF7 and VF6 Bookings: एलन मस्क यांच्या टेस्लाने आपली पहिली कार मॉडेल Y भारतात लाँच केली असतानाच व्हिएतनामची कंपनी Vinfast ने आज भारतीय बाजारपेठेत आपले कामकाज सुरू केले आहे. या कंपनीने दोन आगामी कार VF7 आणि VF6 चे अधिकृत बुकिंग सुरू केले आहे.

आजचा दिवस भारतीय कार मार्केटसाठी खूप महत्वाचा आहे. अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने आपली पहिली कार ‘टेस्ला मॉडेल Y’ लाँच केली असून आज भारतात आपले पहिले शोरूम सुरू झाले आहे. दुसरीकडे, व्हिएतनामी कंपनी Vinfast ने आज भारतात आपले कामकाज सुरू केले असून दोन आगामी कार VF7 आणि VF6 चे अधिकृत बुकिंग उघडले आहे.

Vinfast ने या दोन्ही कारचे अधिकृत बुकिंग सुरू केले आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि अधिकृत डीलरशिपद्वारे हे बुक केले जाऊ शकते. या कार बुक करण्यासाठी ग्राहकांना 21 हजार रुपयांची बुकिंग रक्कम जमा करावी लागणार आहे. VF7 हे फ्लॅगशिप मॉडेल आहे जे कंपनी भारतीय बाजारपेठेत ऑफर करेल आणि तामिळनाडूतील कंपनीच्या प्लांटमध्ये असेंबल केले जाईल.

‘ही’ कार कधी लाँच होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, Vinfast यंदा सणासुदीच्या निमित्ताने आपली पहिली कार लाँच करू शकते. ज्यामध्ये सर्वप्रथम VF7 सादर करण्यात येणार आहे. त्याची डिलिव्हरीही सणासुदीच्या काळात लाँच झाल्यानंतरच सुरू केली जाणार आहे. कंपनीने अलीकडेच 27 भारतीय शहरांमध्ये 32 आउटलेट्स उघडण्यासाठी 13 डीलर गटांशी करार केला आहे, पहिल्या काही डीलरशिप दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद आणि पुण्यात उघडल्या जातील.

Vinfast च्या गाड्या कशा आहेत?

Vinfast VF6 हे कंपनीने ऑफर केलेले एंट्री लेव्हल मॉडेल असेल. या कारच्या आकाराबद्दल बोलायचे झाले तर याची लांबी 4,241 मिमी, रुंदी 1,834 मिमी आणि उंची 1,580 मिमी आहे. यात 2,730 एमएमचा व्हीलबेस देण्यात आला आहे, ज्यामुळे केबिनमध्ये चांगली जागा मिळते. VF6 मध्ये कंपनीने 59.6 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. जे सिंगल चार्जमध्ये 480 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. याच्या हायर व्हेरियंटची इलेक्ट्रिक मोटर 201 एचपीपॉवर आणि 310 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार 17 इंच आणि 19 इंचाच्या चाकांसोबत येते.

दुसरीकडे, Vinfast चे फ्लॅगशिप मॉडेल VF7 आकाराने थोडे मोठे असेल. त्याची लांबी 4545 मिमी, रुंदी 1890 मिमी आणि उंची 1635 मिमी आहे. यात 2,840 मिमीचा व्हीलबेस आहे, जो केबिन-स्पेसच्या बाबतीत VF6 पेक्षा खूप चांगला असेल. ही कार दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह (59.6 केडब्ल्यूएच आणि 70.8 किलोवॉट) येते, जी सिंगल चार्जमध्ये 498 किमीपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. विशेष म्हणजे 8 एअरबॅगसह येणाऱ्या या कारच्या हायर व्हेरियंटमध्ये ऑल व्हील ड्राइव्ह (AWD) व्हेरियंटही देण्यात आला आहे.

किंमत काय असू शकते?

Vinfast ने गेल्या वर्षी तामिळनाडूमध्ये आपल्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले होते, जे जवळजवळ पूर्ण झाले आहे. या महिन्याच्या अखेरीस येथे गाड्यांचे उत्पादनही सुरू करण्यात येणार आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कंपनी आपल्या गाड्या येथे स्थानिक पातळीवर असेंबल करेल. यामुळे किमती कमी राहण्यास मदत होईल. लाँचिंगपूर्वी किंमतींबद्दल काहीही सांगणे कठीण असले तरी तज्ज्ञांच्या मते कंपनी आपले एंट्री लेव्हल मॉडेल 25 ते 30 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत सादर करू शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.