बँक बातम्या: जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा कोटक महिंद्रा बँकेत खाते (Kotak Mahindra Bank) असेल, तर आजची बातमी तुमच्यासाठी खास आहे. देखभालीमुळे दोन्ही बँका या आठवड्यात त्यांच्या काही डिजिटल बँकिंग सेवा (Digital Banking Services) तात्पुरत्या बंद करणार आहेत. ज्यामुळं तुम्ही काही काळ या सेवा वापरू शकणार नाही.
एसबीआयच्या प्रभावित सेवांमध्ये यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस), योनो, आयएमपीएस, ऑटोमेटेड टेलर मशीन (एटीएम), रिटेल इंटरनेट बँकिंग (आरआयएनबी), रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) यासारख्या डिजिटल सेवांचा समावेश आहे. या सर्व डिजिटल सेवा 16 जुलै 2025 रोजी पहाटे 1.05 ते 2.10 दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यासाठी अनुपलब्ध असतील. या कालावधीत, ग्राहकांना UPI Lite वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक पोस्ट शेअर करत, स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की सेवा पुन्हा 2:10 वाजता वापरण्यासाठी उपलब्ध होतील.
UPI Lite ही एक पेमेंट सिस्टम आहे जी लहान व्यवहार (500 रुपयांपेक्षा कमी रक्कम) जलद आणि सहजपणे प्रक्रिया करण्यासाठी डिझाइन केलेली आहे. UPI Lite कसे सक्रिय करायचे ते आम्ही तुम्हाला समजावून सांगतो. समजा तुम्ही Google Pay वापरत असाल, तर प्रथम तुम्हाला अॅप उघडावे लागेल. अॅप उघडल्यानंतर, तुम्हाला सक्रिय UPI Lite पर्याय दिसेल, तुम्ही या पर्यायावर क्लिक करून आणि आवश्यक माहिती भरून UPI Lite सक्रिय करू शकता.
जर तुमचे कोटक बँकेत बँक खाते असेल, तर 17 आणि 18 जुलै रोजी रात्री 12 ते पहाटे 2 वाजेपर्यंत मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंगद्वारे NEFT काम करणार नाही. 20 आणि 21 जुलै रोजी रात्री 12 ते पहाटे 2 वाजेपर्यंत नेट बँकिंग, UPI आणि मोबाईल बँकिंग काम करणार नाही. 20आणि 21 जुलै रोजी रात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत पेमेंट गेटवे सेवा काम करणार नाही. जर तुमचे कोणतेही महत्त्वाचे व्यवहार असतील तर ते आगाऊ करा. दरम्यान, या बँकांच्या सेवा काही काळापुरत्याच बंद करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा