भारतीय बाजारात मारुती सुझुकी कारला पसंद केले जाते. यात हॅचबॅक कार पासून MPV पर्यंत सर्वच कारची विक्री धडक्याने होत आहे. याचे कारण मारुती सुझुकी कारचे मायलेज चांगले आहे.तसेच या कारचे मेन्टेनन्स कॉस्ट कमी आहे. यात मारुती सुझुकी बलेनो कारचा देखील सहभाग आहे. ही कार सिग्मा, डेल्टा, डेल्टा सीएनजी, डेल्टा AMT झीटा,झीटा सीएनजी, Zeta AMT आणि अल्फासह एकूण ९ व्हेरीएंटमध्ये उपलब्ध आहे.
जर तुम्ही मारुती सुझुकी बलेनो खरेदी करण्याचा विचार करत आहेत तर येथे तुमच्या कारचा ईएमआय किती होईल ते पाहूयात. मारुती सुझुकी बलेनोची किंमत ६.७१ लाख रुपयांपासून ९.९३ लाख रुपये एक्स शोरुमपर्यंत जाते. या कारच्या बेस मॉडेलची ऑनरोड किंमत सुमारे ७.६१ लाखच्या आसपास आहे.
या कारच्या बेस मॉडेलला तर तुम्ही एक लाख डाऊन पेमेंटवर खरेदी कराल तर ९.८ टक्के व्याज दराने ७ वर्षांसाठी कारचा ईएमआय जवळपास १०,९०३ रुपये होईल. हा सारा हिशेब ऑनलाईन ईएमआय कॅलक्युलेटरनुसार आहे.जर तुम्ही स्वत: ईएमआयवर कार खरेदी करायला जाल तर बँकेच्या नुसार त्याचा ईएमआय ठरु शकतो.
जर तुम्ही मारुती बलेनोचा डेल्टा (पेट्रोल+CNG) मॉडेल खरेदी करत असाल तर दोन्ही टँक फूल केल्यानंतर तर तुम्ही सहज १००० किलोमीटरहून अधिक प्रवास करु शकता. मारुती बलेनोचा फिचर्सचा विचार करता यात ९ इंचाचा स्मार्ट प्ले स्टुडीओ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीमसह Apple CarPlay आणि Android Auto, OTA अपडेट्स, एक Arkamys-sourced म्यूझिक सिस्टमची सोय आहे. याशिवाय या कारमध्ये हेड्स-अप डिस्प्ले (HUD), क्रूझ कंट्रोल, रियर AC वेंट्स सारखे अनेक फिचर्स पाहायला मिळत आहेत. यासह या कारमध्ये हाईट-एडजेस्टेबल ड्रायव्हर सिट, ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल आणि ६ एअरबॅग मिळतात. सर्वाधिक फिचर्स टॉप मॉडेल वा अपर व्हेरिएंटमध्ये देण्यात आले आहेत.