जर तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करीत आहात तरी ते कमी होत नाहीए..तर तुमच्या काही सवयी वेट लॉसमध्ये अडथळा ठरत असतील. कारण आपल्या काही सवयी वजन वाढवण्यास ( Weight Gain Habits ) कारणीभूत असतात. त्यावर वेळीच जर लक्ष दिले नाही. तर पुढे मग वजन कमी करण्यासाठी खूपच प्रयत्न करावा लागतो.
वनज वाढणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी नवनवीन ट्रेंड पाहायला मिळत आहेत. अनेक लोक डाएटींग आणि एक्सरसाईज करण्याचा आटोकाट प्रयत्न करुनही वजन कमी करु शकत नाहीत. तुम्ही विचार केला आहे का असे का होत आहे ?
आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे ( Habits Which Increase Weight ) आपले वजन वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. याबाबत आपल्या नीट माहीती नसल्याने आपले त्याकडे लक्ष जात नाही. आणि वेट लॉसचे अनेक प्रयत्न वाया जात असता. या ६ वाईट सवयी कोणत्या ते आपण पाहूयात..
अनेक लोक धावपळीच्या जीवनशैलीत जेवण वेळत खात नाही. आणि केव्हाही काहीही खातात. रात्री उशीरा स्नॅक्स खाणे, सकाळी नाश्ता न करणे, एकाच वेळी जास्त जेवणे, या सर्व सवयी मेटाबॉलिज्मचा वेग कमी करतात. जेव्हा तूम्ही खूप काळपर्यंत उपाशी राहता, तेव्हा शरीर चरबीला साठवून ठेवू लागते, त्यामुळेही वजन वाढू लागते.
अपुऱ्या झोपेमुळे देखील वजन वाढू शकते. जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेत नाही तेव्हा शरीरात ग्रेलिन हे भूख वाढवणाऱ्या हार्मोनची पातळी वाढवते आणि भूक कमी करणाऱ्या लेप्टीन या हार्मोनची पातळी कमी होत जाते. यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागत राहाते आणि तुम्ही जादा कॅलरी घेण्यास सुरुवात करता.
धावपळीच्या जीवनशैलीत रोजच तणावाचा सामना करावा लागतो. सारखे तणावात राहील्याने कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढत जाते. हे हार्मोन शरीरात फॅट जमा करु लागते. खास करुन पोटाजवळ. तणावात अनेक लोक जास्त जेऊ लागतात, त्यामुळे वजन वाढू लागते.
शरीरातील पाणी कमी झाल्याने मेटाबॉलिज्म स्लो होत जातो आणि शरीरातील कॅलरी नीटपणे बर्न होऊ शकत नाही.अनेकदा तहानेला आपण भूक समजू लागतो. त्यामुळे आपण गरज नसतानाही कॅलरी कंझ्युम करु लागतो. दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्यायल्याने वजन कंट्रोल करण्यास मदत होते.
डेस्क जॉब वा लेजी लाईफस्टाईलच्या कारणाने अनेक लोक फिजकली इनएक्टीव्ह राहातात. संपूर्ण दिवस बसून राहील्याने आणि एक्सरसाईज न केल्याने कॅलरी बर्न होऊ शकत नाहीत, ज्यामुळे वजन वाढू लागते. यासाठी रोज किमान ३० मिनिटं वॉक किंवा कोणताही व्यायाम करावा.
प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स आणि गोड पदार्थात खुपच जास्त कॅलरीज असते. परंतू अशा पदार्थांत कोणतेही पोषण नसते. यात फूड्स शुगर आणि अनहेल्दी फॅट्स भरपूर असतात. त्यामुळे वजन वाढू लागते. त्याऐवजी फळे, भाज्या आणि होल ग्रेन फूडचा डायटमध्ये समावेश करावा.