धावत्या खासगी बसमध्ये प्रसूती झाल्यानंतर एका महिलेने नवजात अर्भकाला बसमधून बाहेर फेकल्याची भयंकर घटना मंगळवारी परभणी जिह्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला आणि पुरुषाला ताब्यात घेतले आहे. दोघेही पतीपत्नी असल्याचा दावा करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ही ‘संत प्रयाग’ खासगी ट्रव्हल बस पुण्याहून परभणीकडे येत होती. बस पाथरी ते सेलू मार्गावरील देवनांदरा शिवारात आल्यानंतर एका प्रवाशाने नवजात बाळ बाहेर फेकले. ही घटना एका नागरिकाच्या लक्षात आली आणि त्याने तातडीने पाथरी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास केला असता, तो नवजात पुरुष बालक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बसचा माग काढत पोलिसांनी परभणीमध्ये बस थांबवून दोघांना ताब्यात घेतले.
ट्रव्हल बसमध्येच झाली प्रसूती
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, महिलेची प्रसूती ट्रव्हल बसमध्येच झाली होती? त्यामुळे घाबरून नवजात अर्भक बाहेर फेकल्याची शक्यता वर्तवली जात आहे? स्त्री व नर हे एकमेकांचे पती–बायको असल्याचे सांगत आहेत? दरम्यान, दोघांनाही पाथरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याची महिती पोलीस निरीक्षक लांडगे यांनी दिली? अधिक तपास सुरू आहे?