वूमन्स इंडिया क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका जिंकली. भारतीय महिला संघाने क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये टी 20I मालिका जिंकण्याची कामिगरी केली. भारताने ही मालिका 3-2 अशा फरकाने आपल्या नावावर केली. त्यानंतर आता उभयसंघात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.
इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स यांच्यात 16 ते 22 जुलैदरम्यान एकूण 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. हरमनप्रीत कौर भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट दुखापतीनंतर इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. नॅटला टी 20I मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे नॅटला त्या मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यांना मुकावं लागलं होतं. उभयसंघातील पहिल्या एकदिवसीय सामना कुठे आणि कधी होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.
इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला एकदिवसीय सामना बुधवारी 16 जुलै रोजी होणार आहे.
इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला एकदिवसीय सामना द रोझ बाउल, साउथम्पटन येथे आयोजित करण्यात आला आहे.
इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स पहिल्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 5 वाजता टॉस होईल.
इंग्लंड विरुद्ध इंडिया वूमन्स पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.
एकदिवसीय मालिकेत कोण देणार विजयी सलामी?
दरम्यान आता टी 20I नंतर एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाचा विजयी सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. तर यजमान इंग्लंड टीम इंडियाला रोखण्याच्या प्रयत्न करणार आहे. त्यामुळे मालिकेत कोणता संघ विजयी सलामी देतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.