टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने आपल्या लोकप्रिय हॅचबॅक टोयोटा Glanza मध्ये काही नवीन बदल केले आहेत. सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी कंपनीने सर्व व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग स्टँडर्ड केल्या आहेत, तर नवीन प्रेस्टीज पॅकेज देखील सादर करण्यात आले आहे.
या पॅकेजमुळे कार आणखी स्टायलिश आणि कम्फर्टेबल होईल. ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ही कार चांगली दिसते आणि मायलेजही अप्रतिम आहे. आता 6 एअरबॅग्समुळे ती आणखी सुरक्षित झाली आहे.
टोयोटा Glanza चे नवे प्रेस्टीज पॅकेज एक अॅक्सेसरी बंडल आहे. यामुळे कार आणखी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसेल. तसेच दैनंदिन वापरात ही सुविधा अधिक सोयीची ठरणार आहे. हे पॅकेज थोड्या काळासाठीच उपलब्ध असेल. हे खास पॅकेज तुम्ही 31 जुलै 2025 पर्यंतच खरेदी करू शकाल.
Glanza च्या प्रेस्टीज पॅकेजमध्ये प्रीमियम डोअर व्हिझर, बॉडी साइड मोल्डिंग आणि रियर लॅम्प गार्निशचा समावेश आहे. इतर फीचर्समध्ये बाहेरील रियर व्ह्यू मिरर आणि फेंडर्ससाठी क्रोम गार्निश, रियर स्किड प्लेट्स, लाइटेड डोअर सिल्स आणि लोअर ग्रिल गार्निश यांचा समावेश आहे. नव्या फीचर्ससह टोयोटा Glanza ची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 6.90 लाख रुपये आहे.
टोयोटा Glanza ने भारतात सहा वर्ष पूर्ण केली असून 2 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. प्रीमियम हॅचबॅकमध्ये 1.2 लीटर के-सीरिज पेट्रोल इंजिन आहे जे ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 22.94 किमी प्रति लीटर मायलेज देते. तर सीएनजी पर्यायात याचे मायलेज 30.61 किमी प्रति किलो आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये 9 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टिम, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, टोयोटा आय-कनेक्टचे 45 हून अधिक कनेक्टेड फीचर्स आहेत.
टोयोटा Glanza ची रचना शहरी जीवनशैलीनुसार करण्यात आली आहे. एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाले तर यात टोयोटाचे सिग्नेचर ग्रिल, एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि 16 इंचाचे अलॉय व्हील्स आहेत. स्पोर्टिंग रेड, इंस्टा ब्लू, सिल्व्हर, गेमिंग ग्रे आणि कॅफे व्हाईट या दोन रंगांमध्ये तसेच ड्युअल टोन इंटिरिअरमध्ये उपलब्ध आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने यात 6 एअरबॅग, व्हेइकल स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट आणि मजबूत टीईसीटी बॉडी स्ट्रक्चर देण्यात आले आहे.