आजकाल अस्वस्थ जीवनशैलीमुळे तसेच खाण्या-पिण्यावर नियंत्रण नसल्याने वजन वाढण्याच्या समस्या आता सामान्य झाले आहे. बहुतेक लोकं वाढत्या वजनाने त्रस्त आहेत. काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन तासंतास घाम गाळतात, तेव्हा कुठे शरीरातील फॅट कमी होतात. पण अशी काही लोकं आहेत ज्यांना जिमला जाण्यासाठी वेळ नसतो किंवा त्यांना जिममध्ये जायला आवडत नाही. या लोकांसाठी वजन कमी करणे खूप आव्हानात्मक ठरतं. अशातच आजच्या या लेखात आपण काही सोपा उपाय सांगणार आहोत ज्याच मदतीनं तुम्ही जिममध्ये न जाता घरी वजन कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात…
दालचिनी आणि लिंबू पाणी
फॅट लवकर कमी करण्यासाठी तुम्ही दालचिनी आणि लिंबू पाणी पिऊ शकता. लिंबू आणि दालचिनी हे दोन्ही नैसर्गिक डिटॉक्सिफायर्स आहेत जे शरीरातील घाण काढून टाकण्याचे काम करतात. दालचिनी आणि लिंबू पाणी शरीराला आतून स्वच्छ ठेवते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली राहते.
दालचिनी आणि लिंबू पाणी कसे बनवायचे?
एक कप कोमट पाणी घ्या.
या पाण्यात दालचिनी पावडर टाका.
1 चमचा लिंबाचा रस
चवीकरिता 1 चमचा मध
पाणी हलके गरम करा, नंतर त्यात दालचिनी पावडर टाका आणि 5 मिनिटे असेच राहू द्या. त्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि मध टाकून दोन्ही मिश्रण पाण्यात चांगले मिक्स करा. त्यानंतर हे हर्बल पेय तयार आहे. हे पेय दररोज प्यायल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. याशिवाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हे पेय देखील पिऊ शकता.
या गोष्टी लक्षात ठेवा
त्याशिवाय जेवण जेवताना नेहमी शांतपणे जेवा. जे काही खाल ते हळूहळू चावून खा, यामुळे मेंदूला हे समजण्यासाठी वेळ मिळतो की पोट भरलं आहे. अशानं तुमचं ओव्हरईटिंग टाळलं जातं आणि वजन वाढत नाही.
तसेच हे हर्बल पेय पिण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या. रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे पाणी पिऊ नये. जर तुमचे डॉक्टर तुम्हाला ते पिण्याचा सल्ला देतील तरच हे पाणी प्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)