पावसाळा ऋतू म्हणजे सर्वत्र रोमॅंटिक वातावरण असलेला ऋतू.. या दिवसात अनेक जोडपी एकमेंकासोबत जास्तीत जास्त वेळ घालवतात. पावसाच्या रिमझिम सरी कोसळताना जोडीदारासोबत वेळ घालवणं म्हणजे पर्वणीचं असते. पण, हल्लीच्या बिझी शेड्यूलमुळे अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांना एकमेकांसाठी वेळ काढता येत नाही. ज्याचा परिणाम नात्यावर होत आहे. तुमच्याही बाबतीत असचं काहीसं घडतंय? मग अजिबात टेन्शन घेऊ नका.. तुमच्यात निर्माण झालेला दुरावा तुम्ही पावसातील रोमॅंटिक वातावरणामुळे नक्कीच कमी करून शकता. ज्यामुळे दोघांमधील बॉंडिंग आणखीन घट्ट होईल. आज आपण जाणून घेऊयात, दोघांमधील बॉंड आणखीन स्ट्राँग करण्यासाठी टिप्स,
- पावसाळ्यात बाहेर जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरातच छोटा प्लॅन करू शकता. घरात बसून जोडीदारासोबत एखादी छानसी फिल्स किंवा सिरीज पाहू शकता. दोघांमधील बॉंडिंग वाढवण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे.
- पावसात भिजा. एखादे दिवस आरोग्य बाजूला ठेवून पावसात भिजायला काहीच हरकत नाही. जोडीदारासोबत पावसात भिजणे ही गोष्ट वेगळाच आनंद देणारी आहे.
- बाहेर पावसाचं रोमॅन्टिक वातावरण असताना तुम्ही जोडीदारासोबत गरमागरम कॉफी, चहा किंवा भजी, वडापावचा आस्वाद घेऊ शकता.
- मनसोक्त गप्पा मारा. सुट्टीच्या दिवशी एकमेकांच्या आयुष्यात काय सुरू आहे, भूतकाळातील गोष्टीत रमा. दोघांमधील प्रेम पुन्हा नव्याने वाढवण्यासाठी याहून सुंदर ऑपश्न नाही.
- घरात बसून गाणी ऐका. जुनी गाणी आवडतं असतील तर तो देखील पर्याय छान आहे. पावसासह गाण्याचा आनंद घ्या आणि रोमॅंटिक वातावरणाची निर्मिती करा.
- तुम्ही घरातच काही ऍक्टिव्हिटी करू शकता. जसे की, पत्ते खेळणे, गेम्स खेळणे.
- तुम्ही लॉंग ड्राइव्हला सुद्धा जाऊ शकता. एकत्र वेळ घालवण्यासाठी आणि एकमेकांना पुन्हा एकदा समजून घेण्यासाठी ही ट्रिक खूप छान आहे.
- एकाच छत्रीत वॉक करा. याने रोमॅंटिक मूव्हमेंट क्रीएट होईल. चालताना जोडीदारासाठी एखादं गाणं गुणगुणा…
- तुम्ही घरात जोडीदारासोबत डान्सही करू शकता. यामुळे नक्कीच रोमॅंटिक वातावरण तयार होईल.
- एखादी डेट प्लॅन करा.
- कॅफेमध्ये जाऊन कॉफीचा आनंद घेता येईल.
- वरील टिप्स फॉलो करताना जोडीदारासोबत मनातील भावना नक्की व्यक्त करा. यामुळे एकमेकांना नक्कीच स्पेशल वाटेल. पावसाचा मनसोक्त आनंद घ्या आणि मोव्हमेंट क्रीएट करायला विसरू नका.
हेही पाहा –