T20i Series : पाकिस्तान विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी संघ जाहीर, आशियातील 2 संघ भिडणार
GH News July 18, 2025 02:07 AM

बांगलादेश क्रिकेट टीमला श्रीलंका दौऱ्यातील कसोटी मालिकेत 0-1 अशा फरकाने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर श्रीलंकेने बांगलादेश विरुद्धची एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. मात्र बांगलादेशने श्रीलंकौ दौऱ्याचा शेवट अप्रतिम केला. बांगलादेशने 16 जुलैला तिसऱ्या आणि अंतिम टी 20i सामन्यात श्रीलंकेवर 8 विकेट्सने जबरदस्त विजय मिळवला. बांगलादेशने अशाप्रकारे 3 सामन्यांची टी 20i मालिका 2-1 ने जिंकली. त्यानंतर आता बांगलादेश टीम पाकिस्तान विरुद्ध टी 20i मालिकेसाठी सज्ज झाली आहे.

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकूण 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 20 ते 24 जुलै दरम्यान करण्यात आलं आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या टी 20i मालिकेसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. क्रिकेट बोर्डाने कर्णधारपदी लिटन दास याला कायम ठेवलं आहे. लिटनने त्याच्या नेतृत्वात श्रीलंकेविरुद्ध टी 20i मालिका जिंकून दिली.

बांगलादेश संघात तोडीस तोड फलंदाज आहेत. बांगलादेश टीममध्ये लिटन दास, तंजीद हसन, तॉहीद हृदॉय आणि शमीम हुसैन यासारख्या फलंदाजांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी श्रीलंकेविरुद्धच्या टी 20i मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली होती.

मेहदी हसनची कडक बॉलिंग

ऑफ स्पिनर मेहदी हसन याने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी 20i सामन्यात कडक बॉलिंग केली होती. मेहदीने 4 ओव्हरमध्ये 11 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या होत्या. मेहदीने बांगलादेशला तिसरा सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच रिशाद हुसैन आणि मुस्तफिजुर रहमान या जोडीनेही 6 पेक्षा कमी इकॉनमीने धावा देत चिवट बॉलिंग केली. त्यामुळे बांगलादेशचा मायदेशात पाकिस्तान विरुद्ध अशीच कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.

पराभवाने सुरुवात, जोरदार कमबॅक

दरम्यान बांगलादेशची श्रीलंकेविरुद्धच्या टी 20i मालिकेत पराभवाने सुरुवात झाली. मात्र त्यानंतर बांगलादेशने सलग दोन्ही सामने जिंकत मालिका आपल्या नावावर केली. लिटन दास यासह बांगलादेशला विदेशात 2 टी 20i मालिका जिंकून देणारा पहिला कर्णधार ठरला. लिटनच्या नेतृत्वात याआधी बांगलादेशने विंडीजवर 3-0 अशा फरकाने टी 20i मालिका विजय मिळवला होता. आता बांगलादेश मायदेशात कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

टी 20I मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 20 जुलै, शेरे बांगला स्टेडियम, ढाका

दुसरा सामना, 22 जुलै, शेरे बांगला स्टेडियम, ढाका

तिसरा सामना, 24 जुलै, शेरे बांगला स्टेडियम, ढाका

पाकिस्तान विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी बांगलादेश टीम : लिटन दास (कर्णधार), तंजीद हसन, परवेज हुसैन इमोन, मोहम्मद नईम, तॉहीद हृदोय, झाकेर अली, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, महेदी हसन, नसुम अहमद, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब आणि मोहम्मद सैफुद्दीन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.