टाटा पंच: टाटा पंचने चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत 6 लाख युनिट्स उत्पादनाचा टप्पा पार करत भारतातील लोकप्रिय एसयूव्ही म्हणून आपले स्थान अधिक दृढ केले आहे. या यशामधून देशभरातील ग्राहकांमध्ये या कारची लोकप्रियता दिसून येते. टाटा पंचच्या एकूण उत्पादनामध्ये महाराष्ट्राने 12 टक्क्यांचे योगदान दिले आहे.
ऑक्टोबर 2021 मध्ये टाटा पंच लाँच करण्यात आले होती. टाटा पंच पूर्णत: नवीन विभाग ‘सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही’मध्ये आघाडीवर आहे. तेव्हापासून या कारने देशभरातील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गजबजलेल्या महानगरांपासून महत्त्वाकांक्षी दुर्गम भागांपर्यंत पंचची निवड ही विश्वसनीयता आणि स्टाइलची प्रतीक ठरली आहे. तसेच भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्राची रूपरेषा बदलली आहे. या कारने २०२४ मध्ये देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनत इतिहास रचला.
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स याबाबत म्हणाले की, पंचमधून आधुनिक भारतीयांचा उत्साह, तसेच साहसीपणा, स्वावलंबीपणा आणि कोणत्याही मार्गाकडे वाटचाल करण्याची सुसज्जता दिसून येते. 6 लाख युनिट्सचा टप्पा पार करणे उत्पादन यशापेक्षा अधिक आहे, यामधून 6 लाखांहून अधिक भारतीयांनी या कारवर दाखवलेला दृढ विश्वास दिसून येतो.पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्यांसाठी पंच पहिली निवड बनली असल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. पंच फक्त कार नाही तर उल्लेखनीय ब्रँड आहे, ज्याने सांस्कृतिक परिवर्तनाला चालना दिली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
टाटा मोटर्सने देशभरात ‘इंडिया की एसयूव्ही’ ही नवीन मोहिम सुरू केली आहे. ही मोहिम लाखो भारतीयांना प्रशंसित करते, ज्यांनी टाटा पंचला त्यांच्या जीवनाचा भाग बनवले आहे आणि सक्षमीकरण, शोध व दैनंदिन साहसाच्या गाथा दाखवल्या आहेत. यामधून निदर्शनास येते की, टाटा पंच कारपेक्षा अधिक विकसित झाली आहे. ही कार आधुनिक भारतासाठी महत्त्वाकांक्षा व आत्मविश्वासाची प्रतीक बनली आहे. सुरक्षिततेबाबत काळजी करणारे कुटुंबं असो किंवा शहरामध्ये साहसी ड्राइव्हचा आनंद घेणारे असो, द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील उत्साहित तरूण असो किंवा नवीन साहसी ड्राइव्हचा आनंद घेण्याची महत्त्वाकांक्षा असलेले पहिल्यांदा कार खरेदी करणारे ग्राहक असो पंच प्रांतांमध्ये आणि पिढ्यांमध्ये संलग्न झाली आहे. ‘इंडिया की एसयूव्ही’ मोहिम देशाच्या उत्साहाला मानवंदना आहे, जी साहसीपणे व एकत्रित पुढे जात आहे.
आणखी वाचा
Tata Punch CAMO : टाटा पंचची स्पेशल कॅमो एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
आणखी वाचा