पतंजलीच्या स्वदेशी चळवळीनं देशाच्या अर्थव्यवस्थेला दिलं पाठबळ,कंपनीचा भारत घडवण्याचा फॉर्म्यूला
Marathi July 17, 2025 08:25 PM

पतंजली: भारताच्या झपाट्याने बदलणाऱ्या आर्थिक परिस्थितीत पतंजली कंपनीला केवळ व्यावसायिक यशच नाही तर स्वदेशी चळवळीच्या माध्यमातून आत्मनिर्भरता आणि आर्थिक विकासाला चालना दिल्याचा दावा पतंजली करते. पतंजलीने म्हटलं आहे की, आयुर्वेद, जैविक शेती आणि स्वदेशी उत्पादनांना चालना देत त्यांनी भारताला जागतिक मंचावर एक मजबूत ओळख मिळवून दिली आहे.

दंतकांती, केशकांती अन् गायीचं तूप

पतंजलीची सुरुवात दंतकांती, केशकांती आणि तूप अशा आयुर्वेदिक उत्पादनांपासून झाली. या सर्व नैसर्गिक आणि परवडणाऱ्या उत्पादनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनीचा दावा आहे की, या उत्पादनांनी बाजारात स्पर्धा वाढवली, आणि त्यामुळे परकीय कंपन्यांनाही आयुर्वेदिक उत्पादने सादर करावी लागली. यामुळे भारतीय ग्राहकांना स्वदेशी, नैसर्गिक पर्याय मिळाले आणि त्यांच्या भारतीय संस्कृतीशी असलेल्या नात्याला बळकटी मिळाली असं कंपनीनं सांगितलं.

शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कच्च्या मालामुळे ग्रामिण अर्थव्यवस्थेला हातभार

कंपनीचा दावा आहे की, पतंजलीचं स्वदेशी आंदोलन केवळ उत्पादनांपुरतं मर्यादित नाही, तर त्याला एक व्यापक विचारसरणी आहे. यात आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर बदल घडवण्याचा उद्देश आहे. स्थानिक शेतकऱ्यांकडून कच्चा माल खरेदी करून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळ दिलं गेलं. तसेच कारखाने, वितरण केंद्रं आणि किरकोळ विक्रीच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळाला. कंपनीनं अनेक राज्यांमध्ये उत्पादन युनिट्स स्थापन केल्यामुळे स्थानिक औद्योगिक विकासालाही गती मिळाली.

योग, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही योगदान

आयुर्वेदाशिवाय पतंजलीनं शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही महत्त्वाचं योगदान दिलं आहे. पतंजली योगपीठ, पतंजली विद्यापीठ आणि गुरुकुल संस्था प्राचीन भारतीय ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचं संमीलन करत आहेत. देशभरातील पतंजली आयुर्वेदिक रुग्णालयं आणि संशोधन केंद्रे आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय प्रणाली यामधील सहकार्याला चालना देत आहेत.

आर्थिक आत्मनिर्भरतेकडे वाटचाल

पतंजलीनं परकीय ब्रँड्सवरील भारताची अवलंबनता कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा कंपनीनं केला आहे. एफएमसीजी, आरोग्य, वस्त्र आणि दुग्ध व्यवसाय अशा क्षेत्रांमध्ये स्वदेशी पर्याय उपलब्ध करून देत पतंजलीनं आयात कमी केली आणि देशातील धन देशातच राहील यासाठी प्रयत्न केले. हे आर्थिक आत्मनिर्भरतेच्या दिशेने मोठं पाऊल असल्याचं पतंजलीनं सांगितलं.

शेअर्समध्ये वाढ, बोनस शेअर्सवर विचार

अलीकडेच पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये 8.4% इतकी वाढ झाली आहे असा पतंजलीनं सांगितलं. ही वाढ कंपनीच्या आर्थिक बळकटीचा पुरावा आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची 17 जुलै 2025 रोजी बैठक होणार असून, त्यात बोनस शेअर्सवर विचार केला जाणार आहे. यावरून हे स्पष्ट होतं की पतंजली केवळ आर्थिक विकासात भाग घेत नाही, तर गुंतवणूकदारांचा विश्वासही जिंकतोय.

‘मेक इन इंडिया’ मोहिमेशी संलग्न

पतंजलीनं म्हटलं आहे की, त्यांची स्वदेशी चळवळ ही भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी संलग्न आहे. स्थानिक उत्पादन आणि रोजगाराला चालना देणं हे यामागचं प्रमुख उद्दिष्ट आहे. स्वदेशी उत्पादने दर्जेदार असू शकतात आणि परवडणाऱ्या दरात सामान्यांपर्यंत पोहोचू शकतात, हे पतंजलीनं सिद्ध केलंय.

हेही वाचा:

रात्री झोपण्याआधी ‘हे’ ५ पदार्थ खाल्ले तर झोप लागते झक्कास!

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.