पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्याची एक्सक्लुझिव्ह दृश्ये समोर आली आहेत. गोपीचंद पडळकर आपल्या कार्यकर्त्यांसोबत बोलत असताना नितीन देशमुख त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी पडळकर नितीन देशमुख यांच्या अंगावर जाणार होते, मात्र ऋषिकेश चकले यांनी त्यांना अडवले. त्यानंतर गोपीचंद पडळकर निघून गेले. हाच क्षण या संपूर्ण राड्याच्या सुरुवातीचा होता. पडळकर आणि नितीन देशमुख यांच्यात काहीतरी खाणाखुणी, बोलाबोली आणि वाचावाची झाली. त्यानंतर अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेला हा संपूर्ण प्रकार सुरू झाला. ऋषिकेश चकले देखील त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याने गोपीचंद पडळकरांना अडवले. आतमध्ये प्रकार घडला तेव्हा गोपीचंद पडळकर त्या ठिकाणी होते. एबीपी माझाने या घटनेबाबत पहिली प्रतिक्रिया विचारण्याचा प्रयत्न केला असता, “काय प्रकार घडला हे मला माहिती नसल्याचं” गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. नितीन देशमुख बाजूने गेले आणि त्यावेळी गोपीचंद पडळकर आणि नितीन देशमुख यांच्यात बोलाबोली झाली. त्यानंतर ऋषिकेश चकले आणि नितीन देशमुख यांच्यात हाणामारी झाली, जी अवघ्या महाराष्ट्राने बघितली. मुख्यमंत्री हे प्रकरण गांभीर्याने घेतील अशी खात्री व्यक्त करण्यात आली आहे.