Pune: पुण्यातील सराईत गुंडाचा चक्क पोलीस स्टेशनमध्येच राडा; कॉम्प्युटरसह साहित्याची तोडफोड
Marathi July 18, 2025 03:25 PM

गुन्हेगारीची बातमी ठेवा: पुण्यातील गुन्हेगारी विश्वातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये एका आरोपीकडून चक्क पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड करण्यात आली आहे. सहकार नगर परिसरातील एका गुंडाने पोलीस स्टेशनमध्ये राडा घालत ही तोडफोड  केली आहे.  पुढे आलेल्या माहितीनुसार, राजू उर्फ बारक्या लोंढे असं तोडफोड करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.  यात त्याने पोलीस ठाण्यात खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत. कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेत त्याला सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं होतं. याचवेळी या सराईत गुन्हेगाराने पोलीस स्टेशनमध्ये राडा घातला असल्याची माहिती पुढे आली आहे. या राड्यात पोलीस स्टेशनमधील कॉम्प्युटर देखील फोडलं असल्याचे पुढे आले आहे. या घटनेने मात्र पुण्यात कायदा सुव्यवस्था प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून आता सराईत गुन्हेगाराची चक्क पोलीस स्टेशनमध्ये राडा घालण्यापर्यंत मजल गेल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील प्रकारानंतर हिंदू संघटनांच्या वतीने कारवाईची मागणी

बारामतीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोचीतील उपबाजारामध्ये कुत्र्यांनी वासरांना फाडून खाल्ल्यानंतर हिंदू संघटनांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती वरती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. दर गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराचा जळोची येथे मोठा बाजार भरतो. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनावरांची विक्री होते मात्र त्या ठिकाणी गाई वेल्यानंतर त्याने जर खोंडाला जन्म दिला तर त्या ठिकाणी ते सोडून जातात आणि त्यानंतर कालांतराने कुत्रे हल्ला करून त्याचा जीव घेतात याला कृषी उत्पन्न जबाबदार असल्याचा दावा हिंदू संघटनाच्या वतीने करण्यात येतोय.

जर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजार भरत असेल तर ती जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. भटकी कुत्री जनावरांवर हल्ला केल्यानंतर माणसांवरती हल्ला करू लागली तर याला जबाबदार कृषी उत्पन्न बाजार समिती असेल असे देखील दावा अमोल सातकर यांनी केलेला आहे लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीवर गुन्हा दाखल करून कारवाई व्हावी अशी मागणी सातकर करणार आहेत. त्यामुळे या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.