झिम्बाब्वेमध्ये सुरु असलेल्या ट्राय सिरीज मालिकेतील चौथा सामना न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेने 20 षटकात 7 गडी गमवून 120 धावा केल्या आणि विजयासाठी 121 धावा दिल्या. हे आव्हान न्यूझीलंडने 13.5 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. वेस्ली मधवेरे झिम्बाब्वेकडून सर्वाधिक 36 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर फलंदाज काही चांगली करू शकले नाहीत. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने 4 षटकात 26 धावा देत 3 गडी बाद केले. तर एडम मिलने, मिचेल सँटनर, मायकल ब्रेसवेल आणि रचिन रवींद्र याने प्रत्येकी एक गडी बाद केला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी न्यूझीलंडकडून टिम सैफर्ट आणि डेवॉन कॉनवे ही जोडी मैदानात उतरली. पण टिम सैफर्ट फक्त 3 धावा करून बाद झाला. त्यानंतर डेवॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांनी दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. रचिन रवींद्र 30 धावा करून बाद झाला. त्यानंतर डेवॉन आणि डेरिल मिचेल विजयी भागीदारी केली. डेवॉन कॉनवेने 40 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार मारत नाबाद 59 धावांची खेळी केली.
झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा म्हणाला की, ‘आम्हाला अजिबात चांगली फलंदाजी करता आली नाही असे मला वाटतं. पॉवरप्ले ठीक होता पण एकदा फिरकी आली आणि आमची फलंदाजी डगमगली. आम्ही स्वतःला सतत त्यात अडकून देत राहिलो आणि आम्हाला बाहेर येता आले नाही. आम्हाला आमचे कौशल्य सुधारावे लागेल, दुर्दैवाने आजचा दिवस आमच्या स्वतःचे खरे प्रतिबिंब दाखवता आले नाही. जेव्हा विकेटवर सीम आणि फिरकी होती. या विकेटवर 145 धावा चांगली असती.’
न्यूझीलंडचा कर्णधार मिच सँटनर म्हणाला की, ‘आज आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी आव्हान देण्यात आले. माझ्याकडून काही झेल सोडल्याचा प्रकार घडले, त्याशिवाय चांगले होतो.आम्हाला आमच्या दर्जाचा अभिमान आहे. पॉवरप्लेमध्ये ते बॅटने फटके मारणार होते असे दिसत होते आणि त्यांनी तसे केले. गोलंदाजी युनिट म्हणून आम्ही चांगली गोलंदाजी केली. मध्यभागी विकेट घेत राहिलो आणि सुदैवाने आमच्यासाठी काही फिरकी गोलंदाजी देखील होती.’
न्यूझीलंडकडून सर्वोत्तम खेळी करणाऱ्या डेवॉन कॉनवेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. डेवॉन कॉनवे म्हणाला की, मध्यभागी काही वेळ घालवणे छान होते. झेल सोडल्याने भाग्यवान ठरलो. टी20 क्रिकेटमध्ये खेळपट्टीवरचा वेळ महत्त्वाचा असतो. ब्लेसिंगने चांगली गोलंदाजी केली आणि रचिनसोबत फलंदाजी करणे आणि त्या कठीण काळातून बाहेर पडणे छान होते. ते आव्हानात्मक होते आणि त्यांना त्या विकेटवर 120 धावांपर्यंत रोखणे चांगले होते. सुदैवाने फक्त सिकंदरने फिरकी गोलंदाजी केली आणि ते आमच्यासाठी चांगले होते.