एपस्टाईनच्या फाइल उघडल्यास डोनाल्ड ट्रम्प संकटात? यात नेमकं काय लपलंय? वाचा…
GH News July 22, 2025 02:07 AM

अमेरिकेत सध्या एपस्टाईन फाइल्स या गुप्त डायरीची चर्चा आहे. यात अमेरिकन फायनान्सर आणि कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनच्या संबंधित माहिती आहे. या फायलींमध्ये महत्वाची कागदपत्रे, न्यायालयातील रेकॉर्ड, फ्लाइट लॉग आणि एपस्टाईनच्या सेक्स ट्रॅफिकिंग रॅकेटशी संबंधित पुरावे आहेत. या रॅकेटमध्ये 250 पेक्षा जास्त अल्पवयीन मुलींचे शोषण झाले होते.

एपस्टाईनच्या फाइलमध्ये अशा काही प्रसिद्ध व्यक्तींची नावे आहेत जे एपस्टाईनच्या खाजगी जेट आणि बेटांवर आनंद घेण्यासाठी येत असायचे. यात बडे नेते व्यापारी आणि सेलिब्रिटींचा समावेश आहे. या फाइल्स म्हणजे जेफ्री एपस्टाईन आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्धचे पुरावे आहेत.

2025 मध्ये न्यायिक विभागाने रॅकेटशी संबंधित फेज 1 फायली सार्वजनिक केल्या होत्या. यामध्ये एपस्टाईनच्या खाजगी जेटच्या फ्लाइट लॉगची माहितीचा समावेश होता. मात्र अनेक महत्वाची कागदपत्रे अजूनही समोर आलेली नाहीत. काही दिवसांपूर्वी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अॅटर्नी जनरल पाम बोंडी यांना 2019 सालच्या जेफ्री एपस्टाईनशी संबंधित फायली जाहीर करण्याचे निर्देश दिले होते.

अमेरिकेतील काळ्या गुन्हेगारीवर नजर ठेवणाऱ्या काही लोकांनी एफबीआयवर एपस्टाईनच्या काही प्रसिद्ध सहकाऱ्यांचे गुन्हे लपवण्यासाठी महत्वाची कागदपत्रे रोखल्याचा आरोप केला आहे. मात्र राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर ट्रम्प यांनी एपस्टाईनशी संबंधित असणाऱ्या काही फायली सार्वजनिक केल्या आहेत, तसेच आणखी काही फायली समोर आणणार असल्याचे म्हटले आहे. आगामी काळात या फाइली समोर आल्यानंतर यातील माहिती अमेरिकेत खळबळ उडवू शकते.

अश्लील आणि लैंगिक शोषण करणारी कागदपत्रे

एफबीआय आणि तपास संस्थांनी तपासणी केलेल्या फायलींमध्ये शेकडो गीगाबाइट डेटा, अल्पवयीन मुलींचे हजारो आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओचा समावेश आहे. तचेस या फायलींमध्ये श्रीमंत व्यापारी, सेलिब्रिटी, राजकारणी आणि इतर प्रसिद्ध लोकांची नावे आहेत, जे जेफ्री एपस्टाईनच्या पार्ट्यांमध्ये जायचे.

न्यू यॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, एपस्टाईनने माजी प्रेयसी घिसलेन मॅक्सवेलच्या मदतीने अनेक अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढले होते. तसेच या मुलींना लैंगिक कृत्ये करण्यासाठी पैसे दिले जात होते. 2006 मध्ये एफबीआय आणि फ्लोरिडा पोलिसांनी एपस्टाईनने गंभीर आरोप केले होते.

अमेरिकेच्या न्याय विभागाने याबाबत एक अहवाल सादर केला होता. यात त्यांनी एपस्टाईनच्या फायलींमध्ये एपस्टाईन फोटो, अल्पवयीन मुलींचे फोटो आणि व्हिडिओ, दहा हजारांहून अधिक डाउनलोड केलेले व्हिडिओ, बाल लैंगिक शोषण करणारे बेकायदेशीर साहित्य आणि इतर अश्लील साहित्याचा समावेश आहे.

प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश

आतापर्यंत समोर आलेल्या एपस्टाईनच्या फायलींमध्ये डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, प्रिन्स अँड्र्यू, मायकेल जॅक्सन या प्रसिद्ध नावांचा समावेश आहे. 2001 साली या रॅकेटमधील पीडित व्हर्जिनिया गिफ्रेने एपस्टाईन आणि मॅक्सवेलने मला प्रिन्स अँड्र्यूसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले होते असा आरोपही केला होता.

ट्रम्प चिंतेत का आहेत?

अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री तुटली आहे, त्यामुळे आता मस्क या फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे ट्रम्प चिंतेत आहेत. ट्रम्प यांच्याविरुद्ध आतापर्यंत कोणतेही गुन्हेगारी आरोप सिद्ध झालेला नाही. मात्र या फाईल्स समोर आल्यानंतर त्यांच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्याचा फटका त्यांनी बसू शकतो.

कागी अहवालांनुसार एपस्टाईन आणि ट्रम्प हे मित्र होते. ते फ्लोरिडा आणि न्यू यॉर्कमधील पार्ट्यांमध्ये अनेकदा एकमेकांना भेटत असत. एका मुलाखतीत ट्रम्प यांनी एपस्टाईनला ‘शानदार व्यक्ती’ असे म्हटले होते. मात्र 2004 मध्ये दोघांमध्ये फ्लोरिडातील मालमत्ता खरेदी करण्याबाबत चढाओढ निर्माण झाली होती. ट्रम्प यांनी यात बाजी मारली होती.

ट्रम्प यांच्यावर राजकीय दबाव

या प्रकरणामुळे ट्रम्प यांच्यावर दबाव आहे. विरोधक याचा षड्यंत्र म्हणून वापर करतात. त्यांचे समर्थक आणि विरोधक दोघेही ही माहिती उघड करण्याची मागणी करत आहेत. ही माहिती उघड झाल्यास अनेकांची चिंता वाढणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.