ENG vs IND : इंग्लंड विरुद्ध इंडिया तिसरा सामना, कोण जिंकणार मालिका?
GH News July 22, 2025 02:07 AM

भारतीय महिला संघाकडे टी 20I नंतर आता एकदिवसीय मालिका जिंकून इंग्लंड दौऱ्याची अविस्मरणीय सांगता करण्याची संधी आहे. भारताने 5 सामन्यांची टी 20I मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली. भारताची इंग्लंडमध्ये टी 20I मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यानंतर आता 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आता दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम सामना जिंकून मालिका नावावर करण्याची समसमान संधी आहे. मात्र कोणता एकच संघ सामना जिंकणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यात दोन्ही संघात चुरस पाहायला मिळणार इतकं मात्र निश्चित आहे.

हरमनप्रीत कौर हीच्याकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर नॅट सायव्हर ब्रँट इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत आहे. उभयसंघातील तिसरा आणि अंतिम सामना केव्हा आणि कुठे होणार? टीव्हीवर कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.

इंग्लंड विरुद्ध इंडिया तिसरा सामना केव्हा?

इंग्लंड विरुद्ध इंडिया तिसरा सामना मंगळवारी 22 जुलैला होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया तिसरा सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध इंडिया तिसरा सामना रिव्हरसाईड ग्राउंड, चेस्टर ली स्ट्रीट येथे आयोजित करण्यात आला आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया तिसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 5 वाजता टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध इंडिया तिसरा सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया तिसरा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह मॅच पाहता येईल.

एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी

भारतीय महिला संघाने 16 जुलैला इंग्लंडवर 4 विकेट्सने मात करत मालिकेत विजयी सलामी दिली. त्यानतंर दुसऱ्या सामन्यात भारताला विजयासह मालिका जिंकण्याची दुहेरी संधी होती. मात्र या सामन्यात पावसाने खोडा घातला. पावसामुळे 4 तासांचा खेळ वाया गेला. त्यामुळे सामना फक्त 29 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय करण्यात आला. मात्र भारतीय फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे इंग्लंडला 144 धावांचं आव्हान मिळालं. मात्र दुसऱ्या डावात पावसाने खोडा घातल्याने इंग्लंडला सुधारित आव्हान मिळालं. इंग्लंडने हा आव्हान 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. इंग्लंडने अशाप्रकारे डीएसलएसनुसार 8 विकेट्सने हा सामना जिंकला आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यामुळे आता 22 जुलैला कोणता संघ सामन्यासह मालिका जिंकण्याची कामगिरी करतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.