पाकिस्तानी सैन्याने अलीकडेच आपल्या शाहीन-3 मिसाइलची टेस्ट केली. अण्वस्त्र वाहून नेण्यास हे मिसाइल सक्षम आहे. पण ही टेस्ट पूर्णपणे अपयशी ठरली. मिसाइलला आपलं टार्गेट गाठता आलं नाही. पंजाब प्रांताच्या डेरा गाजी खान येथे अणवस्त्र प्रकल्पाजवळ हे मिसाइल कोसळून मोठा स्फोट झाला. या मिसाइलचा ढिगारा बलूचिस्तानच्या डेरा बुगटी जिल्ह्यात पडला. नागरीवस्तीपासून हा भाग खूप जवळ आहे. या घटनेने पाकिस्तानच्या सैन्य क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहेच. पण बलूच नागरिकांची सुरक्षा सुद्धा धोक्यात आणली आहे. 22 जुलै 2025 रोजी झालेल्या या दुर्घटनेनंतर पाकिस्तानी सैन्याने या भागात इंटरनेट बंद केलं. मीडियाला रोखलं व लोकांना घरातच थांबायला सांगितलं.
शाहीन-3 पाकिस्तानच्या शक्तीशाली मिसाइल्सपैकी एक आहे. ही जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारी बॅलेस्टिक मिसाइल आहे. 2750 किलोमीटर अंतरापर्यंत या मिसाइलची मारक क्षमता आहे. म्हणजे दिल्ली, बंगळुरु आणि मुंबईपर्यंत शाहीन-3 मिसाइल पोहोचू शकतं.
या मिसाइलच वैशिष्ट्य काय?
अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता : 20 ते 25 आणि 300-500 किलोटन अणवस्त्र वाहून नेऊ शकते.
सॉलिड फ्यूल : ठोस इंधनावर असल्याने लवकर लॉन्च व्हायला मदत होते.
चीनची मदत : पाकिस्तानने 2000 च्या दशकात चीनच्या मदतीने हे मिसाइल बनवलं आहे.
मिसाइलच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह
हे मिसाइल पाकिस्तानच्या संरक्षण रणनितीचा भाग आहे. खासकरुन भारताला उत्तर म्हणून हे मिसाइल बनवण्यात आलं आहे. पण वारंवार चाचणी अयशस्वी ठरल्याने या मिसाइलच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय.
ही जागा नागरी वस्तीपासून फक्त 500 मीटर अंतरावर
22 जुलै 2025 रोजी पाकिस्तानने डेरा गाजी खानच्या राखी भागात शाहीन-3 मिसाइलची टेस्ट केली. पण हे मिसाइल आपल्या लक्ष्यापासून चुकलं. बलूचिस्तान्चाय डेरा बुगटी जिल्ह्यात मट्ट भागात हे मिसाइल पडलं. ही जागा नागरी वस्तीपासून फक्त 500 मीटर अंतरावर आहे. लूप सेहरानी लेवी स्टेशनजवळ ग्रेपन रवाइन भागात ढिगारा कोसळला. त्याने मोठा स्फोट झाला.
किती किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला?
स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, 20-50 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. यात बलूचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा हे भाग सुद्धा येतात. सोशल मीडियावरच्या काही व्हिडिओमध्ये लोक घाबरुन पळताना दिसतायत. काहींनी दावा केला की, डेरा गाजी खानच्या अणवस्त्र प्रकल्पाच्या ठिकाणी हे मिसाइल पडलं. काही जण म्हणाले की, हा शत्रुचा ड्रोन हल्ला होता. पाकिस्तानी सैन्याने तात्काळ या भागात इंटरनेट बंद केलं. मीडियाला रोखलं व लोकांना घरात रहायला सांगितलं. DG खान कमिश्नरचे प्रवक्ते मझर शीरानी म्हणाले की, ‘कदाचिक कुठल्यातरी फायटर जेटच्या सोनिक बूमचा आवाज होता’