सेंकडहॅण्ड कार खरेदी करायचीय, या 10 गोष्टी तपासा, केवळ इंजिनच नाही तर या बाबीही पाहा
GH News July 23, 2025 11:11 PM

सेंकडहॅण्ड कार खरेदी करणे किंवा विकणे एक समजदारीचा निर्णय होऊ शकतो. जर तुम्हाला सेंकडहॅण्ड कार खरेदी करायची असेल तर खूप साऱ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. पहिला मुद्दा योग्य किंमत ठरवणे. जुन्या गाडीची किंमत केवळ तिचे वय पाहून नव्हे तर तिची कंडीशन, ब्रँड आणि कागदपत्रे अनेक बाबींवर अवलंबून असते. जर तुम्ही सेकंड हॅण्ड कार खरेदी करायला जात आहे. तर काय तपासावे आणि कोणत्या आधारे किंमत निश्चित करावी हे पाहूयात…

ब्रँड आणि मॉडेल

सर्वात आधी गाडीचा ब्रँड आणि मॉडेल तपासा. कार कोणत्या कंपनीची आहे. उदा. Maruti, Hyundai, Honda, Toyota, Tata आदी आणि त्याचे मॉडेल कोणते आहे, याने खूपच फरक पडत असतो. काही ब्रँडची सेंकड व्हॅल्यु अधिक असते कारण ती भरोसेमंद मानली जाते.

मॅन्युफॅक्चरिंगचे वर्ष

जसजशा कार जुन्या होत जातात तसे त्यांची किंमत कमी होत जाते. तरीही कार जर चांगल्या स्थितीत असेल तर कारच्या वयाचा मुद्दा इतका लागू होत नाही.

किती रनिंग झाली ( Odometer Reading )

50,000 किलोमीटर पेक्षा कमी धावलेल्या कार सर्वसाधारण जास्त किमती मानल्या जातात. जास्त काळ धावल्याने इंजिन आणि अन्य पार्टवर अधिक परिणाम होतो.

सर्व्हीस हिस्ट्री

जर कारची नियमित सर्व्हींसिंग झाली आहे आणि त्याचा सर्व्हीस रेकॉर्ड्स उपलब्ध आहे तर कारची विश्वसनियता आणि किंमत दोन्ही वाढते.

इंश्योरन्स आणि क्लेम हिस्ट्री

जर कारचा व्हॅलिड इंश्योरन्स आहे की नाही ? आणि कोणता मोठा क्लेम केला आहे का ? या सर्व बाबी कारची किंमत निश्चित करण्यात महत्वाची भूमिका निभावतात.

गाडीची फिजिकल कंडिशन

बॉडी, पेंट, टायर, ब्रेक आणि इंजिन स्थिती कारची किंमत निश्चित करण्यात महत्वाची भूमिका निभावते.

डॉक्यूमेंट्सची स्थिती

RC, NOC, Pollution सर्टिफिकेट आणि लोन-क्लियरन्स सारखे कागदपत्र जर पूर्ण आणि योग्य आहेत की नाही यावर कार भरवशाची आहे की नाही हे निश्चित होते.

मॉडिफिकेशन आणि एक्सेसरीज

महागडे स्टिरिओ सिस्टीम, अलॉय व्हील्स सारख्या एक्सेसरीज कारची किंमत वाढवू शकतात,परंतू प्रमाणाच्या बाहेर मॉडीफिकेशन गाडीची व्हॅल्यू कमी करु शकते.

लोकेशन (रजिस्ट्रेशन सिटी)

कार कोणत्या राज्यात रजिस्टर आहे. याचाही प्रभाव या सेंकड हॅण्ड खरेदीवर पडतो. उदा. दिल्ली-NCR मध्ये जुन्या डिझेल कारवर सर्वाधिक निर्बंध आहेत.

बाजारातील मागणी

काही मॉडल्स उदा. Swift, Innova वा Alto या मॉडेलच्या सेंकडहॅण्डला जादा मागणी असते. त्यांच्या किंमती जास्त असू शकतात.

जुनी गाडी खरेदी करण्याआधी काय करावे?

टेस्ट ड्राईव्ह घ्यावी

कारची अनुभवी मॅकनिककडून टेस्ट ड्राईव्ह करुन तपासणी करावी, सर्व कागदपत्रांची जाणकारांकडून तपासणी करुन घ्यावी…

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.