Fashion Tips: 40 व्या वर्षीही दिसाल तरुण; या टिप्स फॉलो करा
Marathi July 25, 2025 08:25 PM

आजकाल प्रत्येकाला स्टायलिश दिसायचे असते. महिलांना तर नटायची विशेष आवड असते. सध्या सोशल मीडियावर फोटो टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे. यासाठी अनेकदा आपण आऊटफिट, मेकअप याबाबत कन्फ्युज होतो. त्यासाठी आज आपण तरुण दिसण्यासाठी तुमच्याकडे कोणते आऊटफिट्स असायला पाहिजे किंवा तुमचा मेकअप कसा असावा, स्किनकेअरबाबत जाणून घेणार आहोत.

तुम्हाला तर तरुण दिसायचे असेल तर तुमची त्वचा निरोगी असणे गरजेचे आहे. यासाठी योग्य स्किनकेअर आवश्यक आहे. तसेच आजकालचे ट्रेंडी आऊटफिट तुमच्या कलेक्शनमध्ये असले पाहिजे. कारण तरुण मुलींचा फॅशन सेन्स हा केवळ जीन्स आणि टी-शर्टपुरता मर्यादित नाही. तर आता अनेक ट्रेंडी आऊटफिटचे प्रकार पाहायला मिळतात. क्रॉप टॉप, को-ऑर्डर्स, ओव्हरसाईज्ड शर्ट, स्कर्टची सध्या फॅशन आहे. त्यामुळे हे ट्रेंडिंग कलेक्शन तुमच्या वॉर्डरोबमध्ये असणे गरजेचे आहे.

समन्वय संच:

को-ऑर्ड सेट्स हा एकदम कम्फर्टेबल लूक आहे. हा लूक तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येही सहज कॅरी करू शकता.

ओव्हरसाईज्ड टी-शर्ट:

हे आरामदायी आणि अत्यंत स्टायलिश आऊटफिट आहे. जर एखाद दिवशी तुम्ही आऊटफिटबाबत कन्फ्युज असाल तर तुम्ही चटकन एखादा ओव्हरसाईज्ड टी-शर्ट आणि जीन्स घालू शकता. यामुळे तुम्हाला स्टायलिश लूक मिळेल.

मोनोक्रोम ल्यूक:

मोनोक्रोम लूक म्हणजे एकाच रंगाच्या शेडचे कपडे घालणे. यामुळे तुम्ही सुंदर आणि आकर्षक दिसाल. हा लूक कोणत्याही वयोगटातील आणि कोणत्याही रंगाच्या त्वचेसाठी योग्य आहे. हा एक क्लासी आणि स्टायलिश लूक आहे.

स्किंकर:

त्वचा निरोगी दिसण्यासाठी तुम्हाला योग्य स्किनकेअरची गरज असते. यासाठी आइस फेशियल, घरगुती फेसक पॅक्स मदत करतात. तसेच तुम्ही गुलाब जल, कोरफडचे जेल नियमित चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो.

मेकअप:

आजकाल डार्क मेकअप करण्याचा ट्रेंड नाही. त्यामुळे तुम्ही गरज असल्यास हलका मेकअप करू शकता. लिपस्टिक देखील फिकट रंगाची वापरावे.

मॉइश्चरायझर किंवा बीबी क्रीम:

तुमची त्वचा सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला फाउंडेशनची आवश्यकता नाही. मेकअपचा बेससाठी तुम्ही मॉइश्चरायझर, बीबी किंवा सीसी क्रीम लावू शकता.

भुवया:

तुम्ही तुमच्या भुवयांना नॉर्मल ब्राऊन किंवा ब्लॅक ब्रश करू शकता.

हेअरस्टाईल:

तुम्ही मोकळे केस किंवा मेसी बन ट्राय करू शकता.

जीवनशैलीतील बदल

यासह तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही नियम पाळणे गरजेचे आहे. जसे की भरपूर पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे, स्ट्रेस कमी घेणे, इ.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.