पावसाळ्यात भींतींवर, घरात पाली येण्याचं प्रमाण खूप प्रमाणात वाढतं. सुरुवातीला एखादी पाल घरात फिरताना दिसते. पण त्यानंतर मात्र तिची अनेक छोटी छोटी पिल्लं घरात येताना दिसतात. स्वयंपाक घरात तर या पाली जरा जास्तच फिरतात. स्वयंपाक घरात पाल दिसली की खरोखरच किळस वाटते. शिवाय पालीचे स्वयंपाक घरात फिरणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही वाईटच. त्यासाठी त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तरी त्या खिडकीतून बाहेर जातातच असं नाही काहीवेळा त्या एखाद्या अडचणीच्या जागी लपून बसतात.
कोणतेही दुष्परिणाम नसलेले घरगुती उपाय पालींपासून दूर ठेवण्यास मदत करेल
पालींना घरापासून दूर ठेवण्यासाठी बाजारातून औषध आणलं तरी ते औषधही आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात, विशेषतः लहान मुलांसाठी आणि पाळीव प्राण्यांसाठी. अशा परिस्थितीत, कोणतेही दुष्परिणाम नसलेले घरगुती उपाय तुम्हाला या पालींपासून दूर ठेवण्यास मदत करू शकतात. हे घरगुती उपाय केवळ स्वस्त आणि नैसर्गिकच नाहीत तर घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींनी सहज तयार देखील करता येतात.
या वासांपासून पाली कोसो दूर पळतात
काही गोष्टींचा वास पालींना अजीबात सहन होत नाहीत. पाली या वासांपासून कोसो दूर पळतात. चला तर मग जाणून घेऊयात की त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या पाली दूर पळवण्यासाठी मदत करतील आणि त्यांचा उपाय म्हणून कसा वापर करात येईल ते.
>पाली दूर करण्यासाठी, मिरपूड आणि तंबाखूचा स्प्रे सर्वात प्रभावी ठरतो. यासाठी, पाण्यात थोडी मिरपूड आणि तंबाखू मिसळा, ते एका स्प्रे बाटलीत भरा आणि ज्या कोपऱ्यात पाली दिसतात तिथे फवारणी करा. या मिश्रणातून येणारा तीक्ष्ण वास पालींना अजिबात आवडत नाही. या वासाचा त्यांना खूप त्रास होते आणि ते त्या ठिकाणाहून निघून जातात.
>कांदा आणि लसणाच्या तिखट वासामुळे माणसांच्या डोळ्यांत पाणी तर येतेच पण पालीदेखील त्यापासून दूर पळतात. कांदा आणि लसूणची पेस्ट बनवू शकता आणि ती पाली दिसणाऱ्या ठिकाणी लावू शकता. रात्रीच्या वेळी जेव्हा पाली जास्त सक्रिय असतात तेव्हा हा उपाय विशेषतः प्रभावी ठरतो. हा घरगुती उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि घराच्या वातावरणाला हानी पोहोचवत नाही.
>मोर हे सरड्यांचे नैसर्गिक शिकारी असतात, म्हणून तुमच्या घराभोवती मोराचे पंख ठेवल्याने ते घरात येत नाहीत असं म्हटलं जातं. मोराचे पंख केवळ पालींना दूर ठेवत नाहीत घरातील वैभवही वाढवतात असही म्हटल जातं. याशिवाय, कापराच्या धुराने देखील पाली घरात येण्यापासून बचाव होतो.
>घरातून पाली हाकलण्यासाठी अंड्यांच्या कवचांचा वापर देखील केला जाऊ शकतो. सरडे अंड्यांच्या वासापासून दूर राहतात. उकडलेल्या अंड्याचे कवच अशा ठिकाणी ठेवा जिथे पाली जास्त दिसतात. त्या वासामुळे पाली घरातून निघून जातील.