नवी दिल्ली :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात उत्तरप्रदेशात नोंद गुन्ह्याप्रकरणातील सुनावणीला देण्यात आलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वाढविली आहे. 2022 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीशी संबंधित हे प्रकरण आहे. न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने स्थगितीची मागणी स्वीकार करत सुनावणी 4 आठवड्यांसाठी टाळली आहे