पावसाळा सुरू होताच शरीराची पचनसंस्था थोडी कमकुवत होते. या ऋतूतील आर्द्रता आणि दमटपणामुळे पदार्थ लवकर खराब होते आणि पोटाचे आजार वाढू लागतात. त्यामुळे खाण्यापिण्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. अशातच आपल्या रोजच्या आहारात असलेली पोळीचे मात्र पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विचारपूर्वक खावी. आहारतज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात हलक्या आणि सहज पचणाऱ्या पिठापासून बनवलेल्या रोट्या खाणे चांगले.
आहार तज्ञांचे म्हणणे आहे की बाजरी, मका किंवा नाचणी यांसारख्या जड धान्यांपासून बनवलेल्या भाकरी किंवा पोळीचे सेवन पावसाळ्यात टाळाव्यात कारण त्या पचण्यास जास्त वेळ घेतात आणि त्यामुळे पोटात गॅस किंवा जडपणासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्याऐवजी, या हंगामात गहू, ज्वारी आणि बेसन यांचा आहारात समावेश करणे अधिक फायदेशीर आहे . गव्हाचे पीठ हलके असते, ज्वारीमध्ये फायबर आणि खनिजे असतात आणि बेसन प्रथिने समृद्ध असते जे पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.
आहारतज्ज्ञांचा सल्ला
काही लोकं गव्हाच्या पिठामध्ये थोडे ओट्स पावडर, जवस पावडर किंवा सातू घालूनही पोळ्या बनवतात, ज्यामुळे रोट्या केवळ चविष्टच नाहीत तर अधिक आरोग्यदायी देखील बनतात. या मिश्रणांपासून बनवलेल्या रोट्या शरीराला आवश्यक पोषण प्रदान करतात आणि पावसाळ्यात पचन बिघडण्यापासून देखील रोखतात. आहारतज्ज्ञ असा सल्ला देतात की या ऋतूत पोळ्या ताज्या बनवा आणि त्यांचे सेवन करा. तसेच पोळी खाताना त्यात देशी तुप लावून सेवन केल्यास पचन सुधारते आणि पोळीची किंवा भाकरीची चव देखील वाढते.
गहू, ज्वारी आणि बेसनापासून हे प्रकार बनवा
या तीन पिठांचा वापर फक्त पोळ्या किंवा भाकरी बनवण्यापुरता मर्यादित नाही. तर या पौष्टिक पिठापासून तुम्ही अनेक प्रकार बनवू शकता. त्यातच तेच तेच खाऊन तुम्हाला कंटाळा देखील येणार नाही. तर या पिठापासून काय काय बनवता येईल ते पाहूयात…
1. गव्हाच्या पिठाचा हलवा
गव्हाचे पीठ तुपात चांगले भाजून घ्या त्यानंतर त्यात गूळ आणि ड्रायफ्रुट्स टाका. आता यात गरजेनुसार पाणी टाकूनही शिजवा. ही पारंपारिक डिश शरीराला ऊर्जा देते आणि पावसाळ्यात सर्दी आणि खोकल्यापासून देखील तुमचे रक्षण करू शकते.
2. ज्वारी चिल्ला
ज्वारीच्या पीठात दही, मीठ, मसाले आणि चिरलेल्या भाज्यां मिक्स करून त्यात पाणी टाकून मऊ पातळ पीठ तयार करा. आता हे मिश्रण पॅनवर टाका आणि शिजवा. ही डीश फायबर आणि लोहाने समृद्ध आहे.
3. बेसन पिठाचा ढोकळा
बेसनचा ढोकळा सर्वांणाच खायला आवडते. तसेच हा ढोकळा बनवणे खूप सोपे आहे. तर बेसन पीठात दही, लिंबू किंवा बेक होण्यासाठी इनो टाकून मध्यम अशी पेस्ट करा. आता एका वाडघ्यात हे मिश्रण ओता आणि वाफवून घ्या. नाश्त्यासाठी किंवा हलक्या रात्रीच्या जेवणासाठी हे उत्तम आहे.
4. गव्हाच्या पिठाची लिट्टी
बिहारमधील पारंपारिक पदार्थ लिट्टी हा गव्हाच्या पिठापासून बनवला जातो, यात गव्हाच्या पिठाचा गोळा तयार करून त्यात सत्तू (बारीक केलेले चण्याची पावडर) मसाले आणि लिंबू भरले जाते आणि भाजून घेतले जातात. हा तयार झालेला चोखा वांगी, बटाट्याची चटणी सोबत खाल्ले जाते.
5. बेसन चिल्ला
बेसन चिल्ला हा झटपट होणारा पदार्थ आहे, पावसाळ्यात हा चिल्ला गरम गरम खायला प्रत्येकाला आवडते, तर हा बेसन चिल्ला बनवण्यासाठी बेसन पिठात पाणी, मीठ आणि हळद मिसळा, त्यात कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून पातळ पेस्ट तयार करा. आता हे मिश्रण तव्यावर टाकून भाजून घ्या. हा एक जलद, प्रथिनेयुक्त नाश्ता आहे.
6. गहू किंवा चणा सत्तू पेय
उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात, सत्तूपासून बनवलेले नमकीन किंवा गोड सरबत खूप फायदेशीर असते. ते पोटाला थंडावा देते आणि बराच वेळ भूक लागत नाही.
7. ज्वारी उपमा किंवा खिचडी
ज्वारीची बारीक भरड पुड तयार करून ठेवा आणि नंतर यापासून भाज्या आणि डाळींच्या साहाय्याने उपमा किंवा खिचडी बनवता येते. उपमा किंवा खिचडी ही डिश पचनक्षम आहे आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)