IND vs ENG 4th Test: लंगडत पायरीवरून उतरला... मैदानाच्या पाया पडला, जखमी Rishabh Pant फलंदाजीला आला तेव्हा काय घडलं ते पाहा, Video Viral
esakal July 26, 2025 04:45 PM

England vs India, 4th Test at Manchester Live: भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीत रिषभ पंतची ( Rishabh Pant) चर्चा झाली नाही, तर नवलंच... कारण मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी पायाला झालेल्या दुखापतीनंतरही रिषभ दुसऱ्या दिवशी मैदानावर फलंदाजीला आला. त्याचा निर्धाराने सर्वांना चकित केले आणि मॅच पाहायला आलेल्या प्रत्येकाने स्टेडियमवर उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला.

यशस्वी जैस्वाल ( ५८) आणि साई सुदर्शन ( ६१) यांच्या अर्धशतकासह लोकेश राहुलच्या ४६ धावांच्या जोरावर भारताने चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ बाद २६४ धावा केल्या. रिषभ पंतला झालेली दुखापत ही मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवसाचा चर्चेचा विषय ठरला आणि आज त्याला सहा आठवड्यांसाठी मैदानाबाहेर रहावे लागेल, असा अहवाल आला. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला धक्का बसला आणि रवींद्र जडेजा (२०) बाद झाला. जोफ्रा आर्चरने दुसऱ्या दिवसाची इंग्लंडसाठी चांगली सुरुवात करून दिली.

पुपुनरागमन झालेला शार्दूल ठाकूरने आत्मविश्वासाने फटकेबाजी केली. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल यांनी सहाव्या विकेटसाठी १०१ चेंडूंत ४८ धावा जोडल्या. बेन स्टोक्सने आजच्या दिवसाचा दुसरा धक्का देताना शार्दूलला माघारी पाठवले. शार्दूल ८८ चेंडूंत ५ चौकारांसह ४१ धावांवर बेन डकेटच्या हाती झेल देऊन परतला.

फुटकं नशीब! Rishabh Pant च्या जागी Ishan Kishan ला बोलावणं गेलं, पण तो स्कूटीवरून पडला अन्... आता दुसराच खेळाडू शर्यतीत आला

त्यानंतर रिषभ पंत मैदानावर आला अन् टाळ्यांचा कडकडाट झाला. वेदनाशामक औषध घेऊन तो पुन्हा फलंदाजीसाठी मैदानावर उतरल्याने सर्वांनी त्याचे कौतुक केले.

दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला आणि लंच ब्रेक घेतला गेला. भारताने ३२१ धावांवर ६ विकेट्स गमावल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदर व रिषभ पंत मैदानावर खेळत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.