ऑफिसमध्ये आठ तास स्क्रीनवर काम केल्याने तुमच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होत असतो. त्यात प्रत्येक कामासाठी लॅपटॉपचा वापर करावा लागतो, मग ते अभ्यासासाठी असो वा ऑफिसच्या कामासाठी तुम्ही तासंतास लॅपटॉपवर काम करत असतात. त्यात रोजच्या धावपळीत आपण आपल्या आहाराकडेही नीट लक्ष देत नाही. परंतु याचा परिणाम तुम्हाला होत असतो. यामुळे कमकुवत दृष्टी, डोळ्यांमध्ये कोरडेपणा, खाज सुटणे, लालसरपणा यासारख्या डोळ्यांच्या समस्यांचा धोका वाढतो. आजच्या डिजिटल युगात चुकीच्या सवयींमुळे, चुकीच्या स्थितीत जास्त वेळ बसून काम केल्याने दृष्टी कमकुवत होऊ लागते. चला तर मग जाणून घेऊया या समस्यांपासून कसे मुक्त व्हावे.
आता तुमच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी, तुम्ही तुमची दिनचर्या सुधारली पाहिजे आणि कामाच्या दरम्यान ब्रेक घेत राहावे जेणेकरून लॅपटॉप किंवा फोनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशाचा तुमच्या डोळ्यांवर होणारा वाईट परिणाम कमी होईल.
जर तुम्हीही स्क्रीनवर बराच वेळ काम करत असाल तर हा व्यायाम तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. यासाठी एकाच जागी बसा आणि नंतर 10 वेळा डोळे मिचकावा. डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. असे केल्याने तुम्हाला आराम वाटेल.
डोळ्यांसाठी हा एक सोपा व्यायाम आहे. तर हा व्यायाम करण्यासाठी तुमचे तळवे एकमेकांवर घासून गरम करा आणि नंतर डोळे बंद करून ते हात तुमच्या डोळ्यांवर ठेवा. त्यानंतर 5 मिनिटांनी तुमचे तसेच शांत बसा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो आणि रक्ताभिसरण सुधारते.
हा व्यायाम करणे खूप सोपे आहे. हा व्यायाम करण्यासाठी, तुमचे डोळे उजवीकडे आणि डावीकडे फिरवा. त्यानंतर वर आणि खाली फिरवा. तुमचे डोळे घड्याळाच्या उलट दिशेने आणि घड्याळाच्या दिशेने फिरवा. यामुळे तुमच्या डोळ्यांचा थकवा कमी होईल. तसेच डोळ्यांच्या स्नायूंना ताकद मिळते आणि लवचिकता वाढते.
सर्वप्रथम तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवून बसा, नंतर तुमचे डोळे सरळ ठेवा आणि श्वास घ्या. आता हळूहळू तुमच्या नाकाच्या टोकाकडे पाहण्याचा प्रयत्न करा. काही वेळ तुमची नजर स्थिर ठेवा. यामुळे दृष्टी सुधारते आणि एकाग्रता वाढते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)