SA vs NZ : दक्षिण आफ्रिकेचा संघ अंतिम फेरीत पुन्हा चोकर्स, शेवटच्या 6 चेंडूत झालं असं की…
GH News July 27, 2025 01:07 AM

झिम्बाब्वे टी20 तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 20 षटकात 5 गडी गमवून 180 धावा केल्या आणि विजयासाठी 181 धावांचं आव्हान दिलं. पण दक्षिण अफ्रिकेचा संघ 6 गडी गमवून 177 धावा करू शकला. शेवटच्या षटकात दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी 7 धावांची गरज होती. तसेच हातात सहा विकेट होत्या. जॉर्ज लिंडे आणि डेवॉल्ड ब्रेव्हिस ही जोडी मैदानात होती. मॅट हेन्री शेवटचं षटक टाकण्यासाठी आला. पहिल्या चेंडूचा सामना करता ब्रेव्हिसने निर्धाव घालवला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फटका मारला पण झेल बाद होत तंबूत परतला. त्यामुळे चार चेंडूत 7 धावा अशी स्थिती आली.

कॉर्बिन बॉश मैदानात आला आणि तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. त्यामुळे स्ट्राईक जॉर्ज लिंडेला स्ट्राईक मिळाली. चौथ्या चेंडूवर कॉर्बिनने एक धाव घेतली आणि जॉर्ज लिंडेला स्ट्राईक दिली. त्यामुळे दोन चेंडूत 4 धावा अशी स्थिती आली. पण पाचव्या चेंडूवर लिंडे झेलबाद झाला. त्यामुळे 1 चेंडू आणि चार धावा अशा स्थितीत सामना आला. शेवटच्या चेंडूवर मुथूसामी स्ट्राईकला होता. पण त्याला एकही धाव काढता आली नाही. त्यामुळे हा सामना न्यूझीलंडकडे गेला. अवघ्या तीन धावांनी दक्षिण अफ्रिकेने हा सामना गमावला.

दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन याने सांगितलं की, ‘आम्हाला आमच्या कामगिरीचा अभिमान आहे. आम्ही खूप चांगला खेळ केला. हा मिलिमीटरचा खेळ आहे. आणखी एक सेंटीमीटर हवा होता आणि निकाल कोण ठरवेल हे कोणाला माहिती. संपूर्ण मालिका काहीतरी करून पाहण्याबद्दल आणि थोडे प्रयोग करण्याबद्दल होती, खेळाडूंनी पदार्पण केले, आज आम्ही आमच्या सर्वात मजबूत संघाविरुद्ध खेळलो. एक चांगला आणि अनुभवी संघ आहेत. आम्ही यातून खूप काही शिकणार आहोत आणि जाणार आहोत. सर्वांनी योगदान दिले आहे, विशेषतः तरुण खेळाडू. आमचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे आणि गेल्या काही आठवड्यात आम्ही एक संघ पुढे जात आहोत.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.