Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल
Saam TV July 27, 2025 11:45 AM
  • धाराशिवच्या भूम तालुक्यात पवनचक्की कंपनीवर तलवारी व शस्त्रांनी हल्ला झाला.

  • कर्मचाऱ्यांना मारहाण करत वाहनांची तोडफोड करण्यात आली.

  • रोहित पवारांनी एक्सवर ट्वीट करत सरकारवर गंभीर आरोप केले.

  • ‘नवा आका कोण?’ असा सवाल करत गृहखात्याच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला.

धाराशिवमधील पवनचक्की कंपनीत झालेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर रोहित पवार संतापले आहेत. खंडणीसाठी धाराशिवच्या भूम तालुक्यात पवनचक्की माफीयांचा धुमाकूळ घालत आहेत. तलवारी, लोखंडी साखळ्या, धारदार शस्त्रांनी पवनचक्की कंपनीतील वाहनांची तोडफोड केली होती. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना काही दिवसापूर्वी समोर आली होती. त्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारयांनी सरकारला धाराशिवमधील नवा आका कोण? असा सवाल केलाय. ( Rohit Pawar Questions Dharashiv Windmill Mafia Violence: Who Is The New 'aaka'?)

बीड आणि सांगलीनंतर धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? असा संतप्त सवाल रोहित पवारांनी तोडफोडीच्या घटनेनंतर केलाय. रोहित पवार यांनी एक्स या सोशल माीडिया प्लॅटफॉर्मवर ट्वीट करत सरकारलाजाब विचारलाय. महाराष्ट्रात राजकीय आश्रय मिळत असल्याने आकांची साखळी तयार होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. महाराष्ट्राचा गृहखातं या आकाच्या मुसक्या का आवळत नाही? असा सवाल रोहित पवार यांनी X माध्यमावर ट्विट करत केलाय.

Ajit Pawar News : काही लोक विकृत असतात, अजित पवारांनी आमदार सोनवणेंना सुनावले काय केलंय ट्विट

'महाराष्ट्रात राजकीय आश्रय मिळत असल्याने आकांची साखळी तयार होतेय.पूर्वी पुण्यात दहशत माजवणाऱ्या एका आकाने पोलिसांच्या नाकावर टिच्चून थेट धाराशीवपर्यंत मजल मारलीय.त्याच्या टोळीने धाराशीवमध्ये पवनचक्की कंपनीच्या गाड्यांची तोडफोड करून धुमाकूळ घातलाय.कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत दहशत माजवलीय.

त्याच्या दहशतीमुळं कुणी तक्रार करायलाही पुढं येत नाहीये. बीड आणि सांगलीनंतर आता धाराशीवमध्ये तयार होणारा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? आणि गृहखातं या आकाच्या मुसक्या का आवळत नाही? असा सवाल त्यांनी ट्विटमधून केलाय.

दरम्यान कंपनीच्या वाहनांचे फोटो पोस्ट करताना रोहित पवार यांनी मुख्यमंत्री महोदय, पुलीस की इज्जत का सवाल है! कधी आवळताय या नवीन आकाच्या मुसक्या? 'असं कॅप्शन दिलंय. दरम्यान भूम तालुक्यातील पाथरूडजवळील दुधोडी फाटा येथे खाजगी पवनऊर्जा प्रकल्प आहे. गुरुवारी रात्री येथे काही अज्ञातांनी हल्ला केला. पवनचक्की कंपनीच्या अकरा वाहनांची तोडफोड करण्यात आली. तसेच काही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.