Beauty Tips: मुलायम त्वचा हवी आहे? घरच्या घरी करा सेल्फ वॅक्सिंग तेही अगदी सेफ
Marathi July 27, 2025 07:26 PM

शरीरावरील अवांछित केसांपासून मुक्त होण्यासाठी अनेकजणी नियमित पार्लरमध्ये वॅक्सिंग करतात. पण वेळेचा अभाव, बजेट किंवा प्रायव्हसी यामुळे घरच्या घरी वॅक्सिंग करणं हे आता अनेक महिलांसाठी हवेहवेसे पर्याय बनलं आहे. विशेषतः बिकिनी वॅक्ससारख्या संवेदनशील गोष्टींसाठी घरात स्वतः वॅक्स करणं हा एक विश्वासार्ह पर्याय असू शकतो  जर ते योग्य पद्धतीनं आणि योग्य तयारीनं केलं तर. (how to do waxing at home easy tips in marathi)

चला पाहूया हात, पाय आणि बिकिनी वॅक्सिंगसाठी तुम्ही कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करायला हव्यात.

1) योग्य वॅक्स निवडा:

हॉट वॅक्स जाड केसांसाठी योग्य तर कोल्ड वॅक्स कमी केसांसाठी उपयुक्त ठरतो. आर्मपिट किंवा बिकिनी एरियासाठी हॉट वॅक्स अधिक प्रभावी असतो.

२) एक्सफोलिएशन केले:

वॅक्सिंग करण्याच्या 24 ते 48 तास आधी स्क्रब किंवा लूफाने (scrubber) त्वचा मोकळी करा. यामुळे मृत त्वचा निघते आणि केस चांगल्या प्रकारे निघतात.

3) केसांची लांबी तपासा:

केस खूप लांब असतील तर ते ट्रिम करा. जास्त लांब केस वॅक्सिंग करताना वेदना वाढवतात.

4) उबदार पाण्याने अंघोळ करा:

शॉवरमुळे केसांची मुळे सैल होतात आणि वॅक्सिंग सोपं होतं. त्वचा स्वच्छ असल्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

5) मॉइश्चरायझर वापरू नका:

वॅक्सिंगपूर्वी त्वचेला कोरडं ठेवणं महत्त्वाचं आहे. मॉइश्चरायझर लावल्यास वॅक्स नीट चिकटत नाही.

वॅक्सिंग करताना वापरा या टिप्स:

1) तापमान तपासा:

हॉट वॅक्स करताना वॅक्सचं तापमान आधी मनगटावर तपासा. वॅक्स हीटर वापरल्यास ते अधिक सोयीचं ठरतं.

2) मनपूर्वक तयारी:

ज्या भागात वॅक्सिंग करणार आहात, तिथे मनानेही तयार राहा. झटक्यात वॅक्स स्ट्रिप ओढण्यासाठी मानसिक तयारी आवश्यक आहे.

3) छोट्या भागांत वॅक्स लावा:

लाकडी स्पाटुलाच्या मदतीने केसांच्या वाढीच्या दिशेने वॅक्स लावा. पट्टी लावून ती त्याच दिशेने दाबा.

4) पट्टी झटक्यात ओढा:

सावधगिरी बाळगून वॅक्स स्ट्रिप केसांच्या उलट दिशेने एका झटक्यात ओढा. हात सैल न ठेवता पूर्ण ताणून स्ट्रिप काढा.

5) तीच प्रक्रिया पुन्हा करा:

हात, पाय किंवा इतर भागासाठी हाच पॅटर्न रिपीट करा.

बिकिनी वॅक्सिंग करताना घ्यावयाची काळजी:

बिकिनी वॅक्स करताना त्वचा अतिशय संवेदनशील असते.

1) मासिक पाळीच्या काळात वॅक्स करू नका.

2) सिंथेटिक अंडरगारमेंट्स टाळा, त्याऐवजी सुताची सैल वस्त्रं वापरा.

3) अत्यंत जपून आणि सौम्य वॅक्स वापरणे हितावह ठरते.

वॅक्सिंगनंतर काय काळजी घ्यावी?

1) थंड पाण्याने मसाज:

आर्मपिट किंवा चेहऱ्यावर वॅक्सिंग केल्यानंतर त्वचा शांत करण्यासाठी थंड पाणी किंवा बर्फाचा उपयोग करा.

2) टोनर आणि मॉइश्चरायझर वापरा:

वॅक्स झाल्यानंतर त्वचा स्वच्छ करण्यासाठी टोनर लावा. त्यानंतर सौम्य मॉइश्चरायझिंग क्रीम वापरा.

काही गोष्टी टाळा

1) वॅक्सनंतर 24 तास स्क्रब किंवा एक्सफोलिएशन टाळा.

2) वॅक्सनंतर किमान एक दिवस सूर्यप्रकाशापासून दूर रहा.

3) जर तुम्हाला एक्झिमा, सोरायसिस, मुरुम, मधुमेहसारखे त्वचाविकार असतील तर वॅक्सिंग टाळा.

4) अलीकडेच लेझर, डर्माब्रेशन, केमिकल पीलिंग केलं असेल, तर वॅक्सिंग 5 दिवसांनंतरच करा.

घरी वॅक्सिंग करणे सुरक्षित आणि किफायतशीर असू शकते, फक्त तुम्हाला योग्य माहिती, स्वच्छता आणि काळजी घेणं गरजेचं आहे. एकदा सवय लागली की पार्लरमध्ये वेळ आणि पैसे घालवण्याची गरजही उरणार नाही. स्वच्छ, मऊ आणि आकर्षक त्वचा हवी असेल, तर हे सगळं घरबसल्या शक्य आहे फक्त योग्य पद्धतीने

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.