मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून मंगळवारी पाणीपुरवठा बंद
कल्याण, ता. २६ : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्र येथील देखभाल दुरुस्तीकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे. म.रा.वि.वि. कंपनीचा मीटर युनिट जोडणे व जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल दुरुस्ती करण्याकरिता मंगळवारी (ता. २९) सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवणार आहेत. पालिका क्षेत्रातील कल्याण ग्रामीण विभाग मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे तसेच कल्याण (पश्चिम) ब प्रभाग क्षेत्रातील मिलिंदनगर, योगीधाम, चिकनघर, बिर्ला कॉलेज, मुरबाड रस्ता परिसरातील येथील पाणीपुरवठा बंद असणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत केले आहे.