आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 जुलै 2025
esakal July 28, 2025 01:45 AM

पंचांग -

शनिवार : श्रावण शुद्ध २, चंद्रनक्षत्र आश्लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, सूर्योदय ५.५६, सूर्यास्त ७.१०, चंद्रोदय सकाळी ७.१०, चंद्रास्त रात्री ८.३२, चंद्रदर्शन, अश्वत्थमारुती पूजन, भारतीय सौर श्रावण ४ शके १९४७.

दिनविशेष -

  • २०१४ - भारताच्या नेमबाजांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सोनेरी यश कायम राखले. कोल्हापूरची राही सरनोबतने २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. जयपूरची अपूर्वी चंडेलानेही सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या गटात अनुक्रमे मुंबईच्या अयोनिका पॉल व पुण्याच्या अनिशा सय्यदने रौप्य मिळविले.

  • २०१५ - भारतीय महिलांनी कझाकस्तानमध्ये अस्थाना येथे सुरू असलेल्या कझाकस्तान अध्यक्षीय आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.