Maharashtra Politics: शिंदेसेनेची ताकद वाढली! मुंबईतील दोन माजी नगरसेविकांचा पक्ष प्रवेश
esakal July 28, 2025 02:45 AM

ठाणे : मुंबई महानगरपलिकेतील मालाड पश्चिम येथील काँग्रेसच्या माजी नगरसेविका सलमा आलमेलकर तसेच मानखुर्द शिवाजीनगर येथील समाजवादी पक्षाच्या माजी नगरसेविका आयेशा नूरजहान रफिक शेख यांनी रविवारी ठाण्यात एका कार्यक्रमात शिवसेना पक्षात (शिंदे गट) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. दरम्यान, शिंदे यांनी मुस्लिम समाजातील दोन लाडक्या बहिणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत ही आनंदाची बाब आहे, असे मत याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

दोन माजी नगरसेविकांसह सलीम आलमेलकर, रियाझ बिराजदार, सोहेल आलमेलकर, नसरीन आलमेलकर, रेहमान खान, आशा राजपूत, रफिक शेख, जावेद शेख, इम्रान खाटीक, अर्शद कुरेशी, शफीक कुरेशी, हसनैन कुरेशी, शफीक शेख, मुन्ना कुरेशी व अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी महापौर रमेश वैती, माजी नगरसेवक जयेश वैती, माजी नगरसेवक शरद कणसे, माजी नगरसेवक किरण लांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Dhananjay Munde: ...तर त्याला फाशी द्या, धनंजय मुंडे यांचे वक्तव्य, नेमकं काय म्हणाले? आमदारांचे मुख्यमंत्र्यांकडे विकासनिधीचे साकडे

वर्षा बंगल्यावर झालेल्या कोकण विभागीय आमदारांच्या बैठकीत उल्हासनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विकास निधी मिळण्यासाठी साकडे घातले असून काही योजनांना मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

२५ जुलै रोजी पार पडलेल्या या बैठकीत भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री नितेश राणे, उल्हासनगर आमदार कुमार आयलानी, कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड, मुरबाडचे आमदार किसन कथोरे, आमदार संजय केळकर, महेश चौगुले, ज्ञानेश्वर म्हात्रे, स्नेहा दुबे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विक्रांत पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत महानगरपालिका, नगरपालिका, जिला परिषद तथा ग्रामपंचायत निवडणूक व संघटनात्मक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

मानवी डोळा किती मेगापिक्सेलचा असतो? उत्तर जाणून व्हाल थक्क...

यावेळी कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शहरातील सर्व रस्ते काँक्रीटचे करण्यासाठी आणि विकासकामांकरिता निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. तसेच महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी योजनेसाठी, शासकीय रुग्णालयात २०२ बेड ऐवजी ४०० बेडचीमंजुरी देण्यात यावी.यासोबतच कल्याण पासून ल उल्हासनगर पर्यंत मेट्रो मार्गाच्या कामास सुरवात करण्यात यावी. नर्सिंग स्कूल व फिजियोथेरेपी कॉलेजची सुरवात करण्यात यावी.कल्याण अंबरनाथ रोड शांतीनगर ते साईबाबा मंदिर पर्यंत उड्डाण पूल उभारण्यात यावा.आदी मागण्या केल्या.तेंव्हा फडणवीस यांनी सकारात्मक आश्वासन दिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.