कब्रस्थान म्हटले की, कोणाच्याही डोळ्यासमोर जग सोडून गेलेल्या व्यक्ती आणि त्यांची कब्र येते. कब्रशिवाय काहीही तिथे दिसत नाहीत. आपला जवळचा व्यक्ती सोडून गेला असेल तर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी नातेवाईक बऱ्याचदा कब्रस्थानमध्ये पोहोचतात आणि त्याच्या आठवणीत काही वेळ तिथे थांबतात. बाकी दुसरे कब्रस्थानमध्ये दिसत नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही कब्रस्थानबद्दल सांगणार आहोत, जिथे लोकांच्या कब्र तुम्हाला अजिबात दिसणार नाहीत. मात्र, ते कब्रस्थान आहेत.
चीनमध्ये रेल्वे गाड्यांचे कब्रस्थान
चीनमध्ये एक कब्रस्थान रेल्वे गाड्यांचे आहे. हे कब्रस्थान थेस्सालोनिकी येथे असून अॅटलास ऑब्स्क्युरा वेबसाइटनुसार, 1980 च्या दशकापासून येथे रेल्वे डबे ठेवले जात आहेत आणि वर्षानुवर्षे तिथे आहेत. रेल्वेमधील जुने झालेले रेल्वे डब्बे तिथेच आणून ठेवली जातात आणि ते रेल्वे गाड्यांचे कब्रस्थान म्हणून ओळखले जाते. या कब्रस्थानमध्ये तुम्हाला लोकांच्या कब्र अजिबात दिसणार नाहीत.
ऑस्ट्रेलियात जहाजाचे कब्रस्थान
ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमधील टांगालूमा बीचजवळ चक्क जहाजांचे एक कब्रस्थान आहे. या कब्रस्थानमध्ये तुम्हाला 15 बुडालेली जहाज दिसतील. हे जहाज पाण्यात बुडालेली होती. या जहाजांना पाहण्यासाठी बरेच लोक येथे येतात. याची ओळख जहाजांचे कब्रस्थान म्हणूनच ओळख आहे. इथे फक्त तुम्हाला जहाजांच्या कब्र बघायला मिळतील, तिथे एकही माणसाची कब्र नाहीये. विशेष म्हणजे हे खूप जास्त मोठे कब्रस्थान आहे.
गाड्यांचे मोठे कब्रस्थान
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनमध्ये एक असे कब्रस्थान आहे जिथे गाड्यांचे कब्र आपल्याला बघायला मिळतील. हांगझोऊमध्ये हे गाड्यांचे कब्रस्थान आहे. याठिकाणी जुन्या झालेल्या गाड्यांचे कब्र बनवले जाते. याठिकाणी अनेक प्रकारच्या वनस्पती देखील आपल्याला बघायला मिळतील. लोक त्यांच्या जुन्या गाड्या या ठिकाणी आणतात आणि त्याचे कब्र बनवले जाते.
टेलिफोनचे कब्रस्थान म्हणून ओळख
मागील काही दिवसांपासून तंत्रज्ञात मोठा बदल होतोय. पूर्वी मोबाईल फोन कोणाकडेही नव्हते. त्यावेळी काळ्या आणि लाल रंगाचे मोठ्या आकाराचे टेलिफोन असायचे. त्यावेळी फोनवर बोलण्यासाठी लोक मोठ्या रांगा लावत. मात्र, आता तसे फोन कुठे बघायला देखील मिळत नाहीत. बूथ मर्स्थम येथे हे टेलिफोन आणली जातात आणि ठेवली जातात. हे टेलिफोनचे कब्रस्थान म्हणून ओळखले जाते.
अमेरिकेत विमानांचे कब्रस्थान
अमेरिकेतील अॅरिझोना येथे असलेल्या डेव्हिस मोंथन आर्मी एअर फोर्स बेसच्या नावावर एक विमानाचे कब्रस्थान आहे. हे संपूर्ण जगातील सर्वात मोठे कब्रस्थान आहे. येथे 3200 हून अधिक विमाने, 6100 इंजिने आणि बऱ्याच गोष्टी आहेत. याठिकाणी लोक मोठ्या संख्येने भेट देतात.