Maharashtra Live Politics Update : संसदेत आज ऑपरेशन सिंदूरवर 16 तास चर्चा
Sarkarnama July 28, 2025 01:45 PM
संसदेत आज ऑपरेशन सिंदूरवर 16 तास चर्चा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज (सोमवारी) लोकसभेत पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर तब्बल १६ तासांची चर्चा होणार आहे. विरोधी पक्षाकडून विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सपा प्रमुख अखिलेश यादव आणि इतर पक्षाचे खासदार सरकारला प्रश्न विचारतील. या चर्चावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तर देण्याची शक्यता आहे.

ठाकरे बंधू एकत्र आले तर 11 होतात - बाळा नांदगावकर

ठाकरे बंधूच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी फेसबूकवर पोस्ट करत म्हटले आहे की, 'दोन पक्ष एकत्र येऊन लढतात तेव्हा त्यांची ताकद 1+1=2 अशी होते. पण जेव्हा 2 ठाकरे एकत्र येतात तेव्हा हीच ताकद 1+1=11 होते.'

मंदिरत परिसरात चेंगराचेंगरी, दोन भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील हैदरगड परिसरात असलेल्या प्रसिद्ध अवसानेश्वर महादेव मंदिरात करंट पसरल्याने चेंगराचेंगरी झाली. या घटनेत दोन भाविकांचा मृत्यू झाला असून सुमारे ४० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लोनीकटरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतल्या मुबारकपुरा गावातील २२ वर्षीय प्रशांत आणि आणखी एक भाविकाचा समावेश असल्याची माहिती आहे. आज पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली.

लाडकी बहीण योजनेत तब्बल 26 लाख महिला अपात्र, आदिती तटकरेंनी दिली माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती. यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे, काही कुटुंबामध्ये २ पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत, असे देखील तटकरे यांनी म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.