Explainer story : एका प्राचीन हिंदू मंदिरासाठी दोन बौद्ध देशांचे युद्ध? एकमेकांवर डागताहेत बॉम्बवर्षाव आणि तोफगोळे, 14 जणांचा मृत्यू
GH News July 28, 2025 07:10 PM

एका प्राचीन हिंदू मंदिरासाठी दोन आशियाई देशांत युद्ध छेडले गेले आहे. दोन्ही देश एकमेकांवर बॉम्ब वर्षाव आणि तोफगोळे डागत आहेत. या संर्घषात किमान १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे. हे दोन देश थायलंड आणि कंबोडीया आहेत. येथे हिंदू मंदिरांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे या दोन्ही देशात बौद्ध धर्माचे लोक रहातात. बौद्ध धर्माच्या लोकांची संख्या दोन्ही देशांत नव्वद टक्क्यांहून अधिक आहे. या देशांच्या सीमेवर गेल्या आठवड्यात मोठी हिंसक संघर्ष झाला. या दरम्यान कंबोडियाने थायलंडवर रॉकेट डागले तर प्रत्युत्तर देताना थायलंडने एअरस्ट्राईक केला.

थायलंडने एअरस्ट्राईक का केला ?

गेल्या आठवड्यात गुरुवारी सीमेवर किमान सहा भागात चकमकी झडल्याचे थायलंडच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता सुरासंत कोंगसीरी यांनी सांगितले. हा संघर्ष सुरु होण्याआधी सीमेवरील एका लँडमाईन स्फोटात थायलंडचे ५ सैनिक जखमी झाले होते, यात एक थाई सैनिकांचा पाय उडाला होता. त्यांनंतर थायलंडने कंबोडीयातून आपल्या राजदूतांना माघारी बोलावले आणि कंबोडियाच्या राजदूताला बडतर्फ केले.

प्राचीन मुएन थोम मंदिराच्या मोठी चकमक

कंबोडियाच्या ओडर मींचे प्रांताच्या प्रमुख जनरल खोव ली यांनी सांगितले की शुक्रवारी सकाळी थायलंडसोबत पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे. या संघर्ष प्राचीन ता मुएन थोम मंदिराच्या जवळ झाला आहे. एसोसिएटेड प्रेसच्या वार्ताहराने सीमेजवळ तोफांचा आवाज ऐकला. त्यांनी सांगितले गुरुवारच्या लढाईत किमान चार नागरिक जखमी झाले आहेत. आणि सीमेजवळील गावातील ४,०००० हून अधिक नागरिकांनी आपली घरे सोडून सुरक्षित शिबिरात शरणार्गधी पत्करली आहे.

सीमेवरील गावाती लोकांना घरे रिकामी करण्याचे आदेश

थायलंड आणि कंबोडिया दोन्ही देशांनी एकमेकांवर संघर्ष सुरु करण्याचा आरोप केला आहे. थायलंडचे सार्वजनिक आरोग्य मंत्रालयानुसार, एक थाई सैनिक आणि १३ नागरिक ( ज्यात लहा मुलांचा समावेश ) यांचा मृत्यू झाला आहे. तर १४ सैनिक आणि ३२ अन्य नागरिक जखमी झाले आहेत. थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथाम वेचायाचाई यांनी सांगितले की संघर्षाने चार प्रांतांना प्रभावित केले आहे. सीमेपासून किमान ५० किलोमीटरपर्यंत लोकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्याची व्यवस्था करा असे आदेश गृहमंत्रालयाने दिला आहे.

कंबोडियाची प्रतिक्रिया

कंबोडियाला थाई धमक्यांच्या विरोधात आपल्या सीमेचे संरक्षण करावे लागले असे कंबोडीयाचे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता ले. जनरल माली सोचेता यांनी सांगितले. त्यांनी दावा केला की कंबोडियांच्या हल्ल्यात केवळ सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. कंबोडियाई पंतप्रधान हुन मानेट यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला पत्र लिहून थाई आक्रमण रोखण्यासाठी आपात्कालि बैठक बोलवण्याची मागणी केली. संयुक्त राष्ट्रांनी शुक्रवारी न्युयॉर्कमध्ये दुपारी तीन वाजता बैठक घेतली.

हवाई हल्ले आणि मंदिर परिसराचे नुकसान

थाय वायुसेनेने मान्य केले की त्यांनी एफ – १६ लढाऊ विमानांनी कंबोडियावर दोन वेळा हल्ला केला. थायलंडचे प्रवक्ता निकोर्नदेच बालनकुरा यांनी यास आत्मसंरक्षणासाठीचा हल्ला म्हटले आहे. कंबोडियाने दावा केला आहे की थायलंडच्या जेट्सने प्राचीन प्रीह विहेयर मंजिराच्या जवळ रस्त्यांवर बॉम्ब टाकले. हे मंदिर युनेस्कोद्वारा जागतिक वारसा म्हणून घोषीत केलेले असून कंबोडीयन संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. कंबोडीयन संस्कृती मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार न्यायाची मागणी केल आहे.

राजकारणात खळबळ

संघर्षा आधीपासून दोन्ही देशांचे संबंध बिघडलेले आहे. थायलंडने कंबोडियावर आरोप केला आहे की सीमेवर जो भुसुरुंग फुटला तो नव्याने लावण्यात आला होता आणि रशियन तंत्रज्ञानाचा होता. आणि थायलंड असा भुसुरुंग वापरत नाही. कंबोडियाने हे आरोप निराधार असल्याचे म्हणत फेटाळले आहेत. कंबोडीयानेही प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत आपल्या सर्व डिप्लोमेटिक अधिकाऱ्यांना बँकाँकवरुन माघारी बोलावले आहे. या वादाचा परिणाम थायलंडच्या अंतर्गत राजकारणावरही पडला आहे. पंतप्रधान पेतोंगटार्न शिनावात्रा यांना या महिन्याच्या सुरुवातीलाच हुन सेन यांच्या फोनवरुन संवाद साधल्याने टीकेचा सामना करावा लागला. १ जुलै रोजी त्यांना चौकशीसाठी निलंबित करण्यात आले आहे.

थायलंड आणि कंबोडीयाच्या दरम्यान हिंदू मंदिर वाद काय ?

थायलंड आणि कंबोडीया दरम्यान वाद हिंदू मंदिर ‘प्रेह विहेयर मंदिर’ (Preah Vihear Temple) संबंधित आहे. हे एक प्राचीन शिव मंदिर असून ११ व्या शताब्दीत तयार केले आहे.खमेर वास्तुकलेचे ते उत्कृष्ट उदाहरण म्हटले जाते. हे मंदिर सीमेवरील एक पर्वतात ( डांगरेक पर्वतमाला ) स्थित आहे.या मंदिरामुळे वाद सुरु आहे. मंदिर भौगोलिक रुपाने थायलंड आणि कंबोडियाच्या सीमेवर स्थित आहे. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार थायलंडच्या दिशेला आहे. परंतू ते कंबोडियाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत येते. कंबोडीया हाच दावा करीत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.