घुमडाई मंदिरात आजपासून
भजन महोत्सवाचे आयोजन
मालवण, ता. २८ : घुमडे ग्रामदैवत श्री देवी घुमडाई मंदिरात आयोजित श्रावणधारा महोत्सवांतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत पुरस्कृत व घुमडे ग्रामस्थ मंडळातर्फे उद्यापासून (ता.२९) भजनमहर्षी पंढरीनाथ घाडीगावकर स्मृतीप्रित्यर्थ नामांकित भजनी बुवांचा भजन महोत्सव आयोजित केला आहे. यंदाचे महोत्सवाचे हे ११ वे वर्ष आहे. हा महोत्सव १९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
कार्यक्रम असे ः उद्या सकाळी ९ वाजता धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता श्री सदगुरु संगीत भजन मंडळ, कुडाळ (बुवा-वैभव सावंत), रात्री ८.३० वाजता श्री विमलेश्वर प्रासादिक भजन मंडळ, परेल मुंबई (बुवा-दुर्वास गुरव), ५ ऑगस्ट सकाळी ९ वाजता धार्मिक कार्यक्रम व दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता श्री गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ, वडखोल वेंगुर्ले (बुवा-रूपेंद्र परब), रात्री ८.३० वाजता श्री लिंग माऊली प्रासादिक भजन मंडळ, सांताक्रुज मुंबई (बुवा-श्रीधर मुणगेकर), ७ ऑगस्ट सायंकाळी ७ वाजता संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग (‘काशी भविष्यकथन’)-कलाकार ः गणपती-दिलीप सुतार, ब्रह्मदेव-मामा माळकर, रिद्धी सिद्धी-भावेश तळासकर, पार्वती-गोट्या येरागी, इंद्र-केशव खांबल, नारद-चारु मांजरेकर, योगिनी-शिवा मेस्त्री, देवदास-नारायण आशियेकर, अनांग मोहिनी-सुधीर तांडेल, अग्नी-सागर गावकर, शंकर-दत्तप्रसाद शेणई, यमधर्म-उदय मोर्ये, गणपती-गौरव शिर्के, ज्योतिषी-संदेश वेंगुर्लेकर, ब्राह्मण-प्रथमेश सामंत, महाविष्णु-देवेंद्र कुडव, संगीत साथ-हार्मोनियम पप्पु घाडीगावकर, मृदंग-पियुष खंदारे, तालरक्षक-विनायक सावंत यांचा समावेश आहे. त्यांना विशेष सहाय्य मामा माळकर पुरस्कृत बाळकृष्ण दशावतार नाट्यमंडळ मालवण कोळंब (भटवाडी) यांनी केले आहे.
१२ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता श्री भुतनाथ प्रासादिक भजन मंडळ, वायरी मालवण, बुवा-भालचंद्र केळुसकर, रात्री ८.३० वाजता श्री दत्तप्रासादिक भजन मंडळ, भांडुप मुंबई. बुवा-भगवान लोकरे. १४ ऑगस्टला सकाळी ८ वाजता लघुरुद्र, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग (‘कालचक्र’)-कलाकार ः गणपती- काका कलिंगण, रिद्धी सिद्धी-योगेश वस्त, देवराज इंद्र-बबलु मेस्त्री, यमधर्म-दादा राणेकोनस्कर, राजा सुशील-विलास तेंडुलकर, राणी उर्वी-संजय लाड, अधमासूर-पिंट्या दळवी, नारद-सुभाष लोंडे, शंकर-उदय राणेकोनस्कर, राजकन्या धुती-यश जळवी, यती-उल्हास नाईक, ब्राह्मण-काका कलिंगण, माळी-सुधीर देवळी यांचा समावेश आहे. त्यांना संगितसाथ हार्मोनियम आशिष तवटे, मृदंग चंद्रकांत खोत, तालरक्षक राजू कलिंगण देणार आहेत. तर विशेष सहाय्य लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचे लाभणार आहे. १९ ऑगस्टला सकाळी ९ वाजता धार्मिक कार्यक्रम व दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता श्री वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ, लिंगडाळ देवगड (बुवा संदीप लोके), रात्री ८.३० वाजता श्री गंभिरेश्वर प्रासादिक भजन मंडळ, घाटकोपर मुंबई, (बुवा लक्ष्मण गुरव) यांची भजन सेवा होणार आहे.