राज्यात तयार होणार नवा महामार्ग
नाशिक ते अक्कलकोट फक्त ४ तासांत पोहोचता येणार
६ राज्यांमधून जाणारा महामार्ग मंजुरीच्या मार्गावर
सूरत ते चेन्नई महामार्गातील महत्वाचा टप्पा.
नाशिकवरून अक्कलकोटला जाणाऱ्यांसाठी आणि अक्कलकोटवरून नाशिकला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण हा प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. चेन्नई ते सूरत द्रुतगती महामार्ग प्रकल्पातील रखडलेल्या नाशिक ते अक्कलकोट महामार्गाचा तिढा अखेर सुटला आहे. हा रखडलेला प्रकल्प आता बांधा -वापरा-हस्तांतरीत करा म्हणजेच बीओटी तत्वावर बांधण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव नुकताच केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला. केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर याबाबत निविदा काढला जाईल.
नाशिक ते अक्कलकोट प्रवास ४ तासांत -हा महामार्ग तयार झाल्यानंतर नाशिकते अक्कलकोट असा ३७४ किलो मीटरचा प्रवास फक्त ४ तासांत करता येईल. सध्या नाशिक ते अक्कलकोट प्रवासासाठी ९ तासांचा कालावधी लागतो. हा महामार्ग तयार झाल्यानंतर प्रवासाचा वेळ ५ तासांनी कमी होणार आहे. एनएचएआय कंपनीकडून १,२७१ किलो मीटरचा चेन्नई ते सूरत द्रुतगती महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.
Leader Highway Viral Video : नेत्यासोबत हायवेवर शारीरिक संबंथ, VIDEO मधील महिलेविषयी मोठी माहिती पोलिसांच्या हाती ६ राज्यातून जाणार महामार्ग -हा महामार्ग गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यामधून जाणार आहे. या महामार्गामुळे ही सर्व राज्ये आणखी जवळ येणार आहेत. त्याचसोबत सूरत, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, कुलबुर्गी, कुरनूल, कडप्पा आणि तिरुपती या शहरांना हा महामार्ग जोडला जाणार आहे. या महामार्गामुळे या शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी खूपच कमी तास लागणार आहे.
Mumbai-Ahmedabad Highway : मॉर्निंग वॉक करणाऱ्याला ट्रकने उडवले, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद, VIDEO दोन टप्प्यात होणार महामार्गाचे काम -सूरत ते सोलापूर आणि सोलापूर ते चेन्नई या दोन टप्प्यामध्ये या महामार्गाचे काम केले जाणार आहे. या दोन टप्प्यात आणखी काही टप्पे आहेत. नाशिक- अक्कलकोट हा ३७४ किलो मीटर लांबीचा आणि सहा मार्गिकेचा महामार्ग त्यामधील पहिला टप्पा असणार आहे. तो बांधण्यासाठी एनएचएआय कंपनीने ६ महिन्यांपूर्वी हायब्रिड अॅन्युइटी मॉडेलनुसार निविदा काढली होती. पण ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. तांत्रिक आणि आर्थिक कारणांमुळे हा प्रकल्प बीओटी तत्वावर करण्यात येणार आहे.
Mumbai - Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचं काम अपूर्ण; टोल नाके मात्र पूर्ण, शरद पवार गट आक्रमक | VIDEO महामार्गाची वैशिष्ट्ये काय?- नाशिक ते अक्कलकोट माहमार्ग नाशिक ते अहिल्यानगर आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट या दोन टप्प्यात तयार केला जाणार आहे.
- नाशिक ते अहिल्यानगर टप्पा १५२ किलो मीटरचा तर अहिल्यानगर ते अक्कलकोट हा दुसरा टप्पा २२२ किलो मीटरचा असणार आहे.
- सूरत ते चेन्नई द्रुतगती महामार्ग सुरू झाल्यानंतर नाशिक ते सूरत प्रवास फक्त २ तासांत करता येईल.
- हा महामार्ग गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या ६ राज्यांमधून जाणार आहे.
- हा महामार्ग नवसारी येथे दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे.
- हा महामार्ग तयार झाल्यानंतरद दिल्लीला जाणं देखील सोपं होईल.
- ३७४ किलो मीटरच्या या महामार्गामुळे नाशिक ते अक्कलकोट प्रवास फक्त ४ तासांचा होईल.
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर गॅस टँकर पलटी; १० तासांपासून वाहतूक ठप्प, गावातील २०० जणांचं स्थलांतर